Marathi

Walking Benefits

10 ते 60 मिनिटे वॉक करण्याचे हे आहेत मोठे फायदे

Marathi

आरोग्यासाठी फायदेशीर

दररोज कमीत कमी दहा ते एक तास चालावे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. यामुळे शरीराचे स्नायू मजबूत होण्यासह आपले काही आजारांपासून संरक्षण होण्यास मदत मिळते.

Image credits: Getty
Marathi

10 मिनिटे चालण्याचे फायदे

नाश्ता किंवा जेवणानंतर दररोज 10 मिनिटे चालावे. यामुळे शरीरातील रक्तशर्कराची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. ज्यामुळे टाइप-2 मधुमेहाचा धोका कमी होतो.

Image credits: Getty
Marathi

कोलेस्ट्रॉल

रोज 20 मिनिटे ब्रिस्क वॉक केल्याने वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त रक्तदाब, कोलेस्ट्रॉल व मधुमेहाची समस्या दूर राहते. 

Image credits: Getty
Marathi

रोगप्रतिकारक शक्ती

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज 30 मिनिटे वॉक करा. यामुळे आरोग्याचे रक्षण करणाऱ्या शरीरातील पेशी देखील सक्रीय होतात.

Image credits: Getty
Marathi

ताण-तणाव

नियमित 4.5 किलोमीटर अंतर भराभर चालल्यास शारीरिक-मानसिक ताण-तणाव कमी होतो. यामुळे शरीरामध्ये हॅपी हार्मोन्सचा स्राव अधिक होतो, ज्यामुळे चांगली झोप मिळते. 

Image credits: Getty
Marathi

वेट लॉस

दररोज 6 किलोमीटर अंतर चालल्यास किंवा 50 मिनिटे वॉक केल्यास शरीरातील जवळपास 350-400 कॅलरीज् बर्न होऊ शकतात. यामुळे तुमचे वजन झटपट कमी होऊ शकते. 

Image credits: Getty
Marathi

मानसिक आरोग्य

नियमित एक तास ब्रिस्क वॉक केल्यास मेंदू व मज्जासंस्थेवर सकारात्मक परिणाम होतात. यामुळे मानसिक आरोग्य सुधारते.

Image credits: Getty
Marathi

या गोष्टी लक्षात ठेवा

चालताना घाई करू नका तसेच दुखापती टाळण्यासाठी योग्य पद्धतीने चालावे. तोंडावाटे श्वास घेणे टाळा.

Image credits: Getty
Marathi

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image Credits: Getty