पाढे पाठ करण्याची ही आगळीवेगळी सोपी पद्धत होतेय व्हायरल, Watch Video

| Published : Feb 06 2024, 12:55 PM IST / Updated: Feb 06 2024, 01:04 PM IST

viral video teaching tables

सार

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील शिक्षकांनी पाढे लक्षात ठेवण्याची एक सोपी पद्धत सांगितली आहे. म्हणूनच हा व्हिडीओ व्हायरल होत असून पाढे पाठ करण्याच्या या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे लोक कौतुक करत आहेत. 

Unique way of teaching tables viral video : शालेय जीवनात गणित या विषयाने भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. गणित पक्के हवे असेल तर पाढे चांगले पाठ असायला हवेत असे घरात आईवडील आणि शाळेत शिक्षक मुलांना कायम सांगत असतात. पाढे पाठ करण्याची ही सोपी व आगळीवेगळी पद्धत सध्या व्हायरल झाली आहे.

साधारणपणे पाढे पाठ करण्याची पद्धत अशी असते की रोज एकदा बेचा पाढा ते तीसच्या पाढ्यापर्यंत मोठ्याने पाढे म्हणायचे म्हणजे ते पाठ होतात आणि रोज म्हटल्याने लक्षात देखील राहतात. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील शिक्षकांनी मात्र पाढे लक्षात ठेवण्याची एक सोपी पद्धत सांगितली आहे. म्हणूनच हा व्हिडीओ व्हायरल होत असून पाढे पाठ करण्याच्या या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे लोक कौतुक करत आहेत, तर काहींना त्यात त्रुटीही दिसत आहेत.

पाढे पाठ करण्याची सोपी पद्धत

बाबुराम चौधरी नावाच्या युजरने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक शिक्षक मुलांना शिकवताना दिसत आहेत. या गुरुजींची गणित शिकवण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. ते नेहमीच्या पद्धतीने पाढे शिकवत नाहीत ,तर उलट मोजणी करत आहेत. व्हिडिओत गुरुजींनी 4 चा पाढा कसा मोजायचा हे करून दाखवले आहे. त्यासाठी त्यांनी एक , दोन आणि तीन या आधीच लिहिलेल्या पाढ्यांचे अंक विशिष्ट पद्धतीने मोजले आणि 4 चा चा पाढा मुलांना लिहून दाखवला. व्हिडीओ बघितल्यास तुम्हाला कळेल की त्यांनी नेमकी कोणती पद्धत वापरली आहे. अशा पद्धतीने मुलांना पाढे पाठ करणे सोपे जाईल असे प्रथमदर्शनी वाटते.

View post on Instagram
 

नेटकऱ्यांनी दिल्या मिश्र प्रतिक्रिया

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर 22 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि या व्हिडिओला 8 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना, काही लोक शिक्षकांच्या या पद्धतीचे कौतुक करत आहेत. काहीं युझर्सने अशी कमेंट केली की, “या पद्धतीने मुलांना पाढे सहज लिहिता येतील.” पण काहींना मात्र गुरुजींची ही पद्धत चूक आहे असे वाटते आहे. एका युझरने कमेंट करताना असे लिहिले की, 'सॉरी गुरुजी, या पद्धतीने मुले पाढे लिहून तर काढतील पण त्यांना पाढे पाठ होणार नाहीत आणि लक्षातही राहणार नाहीत.” दुसऱ्या युझरने लिहिले की, “'मुलांना अंक कसे लिहायचे हे शिकवण्याचा हा एक अतिशय उत्तम मार्ग आहे,तुम्ही प्रतिभावान आहात.” तर तिसऱ्याने लिहिले, “पाढे लिहिण्याची पद्धत योग्य आहे, या पद्धतीने पाढे लिहीत गेल्यास मुलांना गणितं सोडवताना पाढे अजिबात आठवणार नाहीत.”

आणखी वाचा -

OMG! बांगड्या विकणाऱ्या महिलेचा Fluent English बोलतानाचा VIDEO VIRAL, युजर्स करताहेत कौतुक

काश्मीरमधील बर्फवृष्टीचे रिपोर्टिंग करणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींचा Cute व्हिडीओ आनंद महिंद्रांनी केला शेअर (Watch Video)

Blue Flag Beaches of India : निळेशार पाणी व निसर्ग सौंदर्याने नटलेला राधानगर बीच, Watch Video