सार

त्या महिलेचे केवळ अस्खलित इंग्रजीच नव्हे तर तिचा ॲक्सेंट ऐकून देखील इंटरनेट युझर्स तिचे फॅन झाले आहेत. आणि मनमोकळेपणाने तिचे कौतुक करताना दिसत आहेत.

टॅलेंटेड लोकांची आपल्या देशात कधीच कमतरता नव्हती. परंतु सोशल मीडियाचा उदय झाल्यापासून लोकांचे टॅलेंट जगासमोर येणे सोपे झाले झाले. सध्या सोशल मीडियावर असाच एक टॅलेंटेड महिलेचा व्हिडीओ ट्रेडिंग आहे. या व्हिडिओत गोव्याच्या बीचवर बांगड्या विकणाऱ्या महिलेचे फाडफाड इंग्रजी ऐकून लोक प्रभावित झाले आहेत.

इंटरनेट युझर्स झाले प्रभावित

एका इंस्टाग्राम युझरने त्याच्या अकाउंटवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला गोव्याच्या Vagator बीच वर बांगड्या विकताना दिसते आहे. सदर व्यक्ती तिच्याशी बोलायला गेली असता महिलेने अस्खलित इंग्रजीत उत्तर दिले. त्या महिलेचे केवळ अस्खलित इंग्रजीच नव्हे तर तिचा ॲक्सेंट ऐकून देखील इंटरनेट युझर्स तिचे फॅन झाले आहेत. आणि मनमोकळेपणाने तिचे कौतुक करताना दिसत आहेत.

आतापर्यंत 1 कोटी 95 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून या व्हिडिओला 10.94 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तसेच 8000 हून अधिक लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. काही युझर्सने लिहिले की- , “यांचे इंग्रजी तर माझ्यापेक्षाही चांगले आहे” तर काहींनी कमेंट केली आहे की, ही महिला जिथे राहते तिथे तिला नेहमीच परदेशी लोकांशी बोलण्याची संधी मिळते, त्यामुळेच त्यांचे इंग्रजी चांगले पक्के झाले आहे.

काही युझर्सने असा अंदाज लावला की कदाचित ही महिला दक्षिण भारतीय असावी म्हणूनच त्यांचे इंग्रजी इतके चांगले आहे.

व्हिडिओमध्ये महिलेने सांगितली कोरोनानंतरची परिस्थिती

व्हिडिओमध्ये दिसते आहे की ही महिला बांगड्या व मोत्यांचा हार यांची विक्री करते. त्या हे काम किती दिवसांपासून करत आहेत हे देखील त्यांनी अस्खलित इंग्रजीत सांगितले. वॅगेटोर बीच काळ्या खडकांसाठी आणि स्वच्छ निळ्याशार पाण्यासाठी ओळखला जातो.गोव्यातील अधिक गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्यांपासून दूर शांतता शोधणाऱ्या पर्यटकांमध्ये हा फार पूर्वीपासून लोकप्रिय आहे. कोरोनाच्या साथीनंतर बीच वर काय काय बदल झाले आहेत. अशीही त्यांनी पुढे माहिती दिली. व्हिडिओमध्ये त्यांनी समुद्रकिनाऱ्याच्या बदलत्या परिस्थितीबद्दल इंग्रजीमध्ये स्पष्टीकरण दिले आहे.

व्हिडीओ अपलोड करणाऱ्या युझरने “आयुष्य कसेही असू देत, ते छान पद्धतीने जगता आले पाहिजे”, असे या व्हिडिओला समर्पक असे कॅप्शन दिले आहे.

लोकांनी केले भरभरून कौतुक

बीचवर बांगड्या विकणाऱ्या सर्वसामान्य महिलेचे अस्खलित इंग्रजी व परफेक्ट ॲक्सेंट ऐकून युझर्सने त्यांचे कौतुक करत कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एका युझरने गमतीत अशी कमेंट केली की, “नाऊ माय इंग्लिश इस क्राइंग इन द कॉर्नर” तर एका युझरने लिहिले की, “या ताईंचे इंग्रजी व्याकरण आणि शब्दांचे उच्चार तर माझ्या ऑफिस सहकाऱ्यांपेक्षाही चांगले आहेत.”

एका युझरने कमेंट केली की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो कोणी पिईल तो गर्जना करेल.

येथे बघा व्हिडीओ- 

 

View post on Instagram
 

 

आणखी वाचा - 

Israel-India : 71 टक्के इस्राइली नागरिकांनी भारताबद्दल व्यक्त केले हे मत, चीन-पाकिस्तानवर विश्वास नसल्याची दिली प्रतिक्रिया

काश्मीरमधील बर्फवृष्टीचे रिपोर्टिंग करणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींचा Cute व्हिडीओ आनंद महिंद्रांनी केला शेअर (Watch Video)

दूध विक्री करणाऱ्याची मुलगी बनली IAS, शिक्षणाची फी भरण्यासाठीही नव्हते पैसे