काश्मीरमधील बर्फवृष्टीचे रिपोर्टिंग करणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींचा Cute व्हिडीओ आनंद महिंद्रांनी केला शेअर (Watch Video)

| Published : Feb 05 2024, 10:44 AM IST / Updated: Feb 05 2024, 10:46 AM IST

Anand Mahindra Shares Twin Sister Video
काश्मीरमधील बर्फवृष्टीचे रिपोर्टिंग करणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींचा Cute व्हिडीओ आनंद महिंद्रांनी केला शेअर (Watch Video)
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या विषयांवरील आणि सुंदर व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच आताही आनंद महिद्रांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये दोन चिमुकल्या मुली रिपोर्टिंग करताना दिसून येत आहेत.

Viral Video : उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच आपल्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्मवर काही नाविन्यपूर्ण आणि सुंदर व्हिडीओ-फोटो शेअर करत असतात. अशातच आनंद महिंद्रा यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोन चिमुकल्या मुली काश्मीरमधील बर्फवृष्टीचे रिपोर्टिंग करत असल्याचे दिसून येत आहे.

आनंद महिद्रांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काय?
व्हिडीओमध्ये दोन मुली, ज्या जुळ्या बहिणी आहेत त्या काश्मीरमधील बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. याशिवाय बर्फवृष्टी होण्याची त्या दोघींकडून वाट पाहिली जात होती आणि त्यासाठी त्यांनी प्रार्थना देखील केली होती. काश्मीरमध्ये झालेल्या बर्फवृष्टीला त्यांनी जन्नत असे म्हटले आहे. याशिवाय, आम्ही येथे खूप मजा-मस्ती करत आहोत असेही त्या दोघींनी रिपोर्टिंग करताना म्हटले. या व्हिडीओला आतापर्यंत बहुसंख्येने पाहिले आहे.

 

नेटकऱ्यांनी व्हिडीओवर दिल्या अशा प्रतिक्रिया
नेटकऱ्यांनी आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हिडीओखाली वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले की, "फारच सुंदर व्हिडीओ आहे." दुसऱ्याने म्हटले, "मुलीच्या चेहऱ्यावरील हावभाव खूपच क्युट असून दोघी बहिणीही सुंदर आहेत." अन्य एकाने लिहिले की, "सुंदर व्हिडीओ असून पाहून मजा आली, खरंच व्हिडीओ शेअर करण्यासारखा आहे."

आणखी वाचा : 

Interim Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी टॅक्स स्लॅबबद्दलच्या केलेल्या घोषणेनंतर नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

दूध विक्री करणाऱ्याची मुलगी बनली IAS, शिक्षणाची फी भरण्यासाठीही नव्हते पैसे

Ayodhya Ram Mandir : राम मंदिराचा पहिला Video समोर, पाहा परिसरातील मनमोहक दृश्य