सार
अतुलनीय निसर्गसौंदर्य असलेले हे राधानगर बीच (Radhanagar Beach) जगातील सातव्या क्रमांकाचे सर्वात सुंदर बीच म्हणून ओळखले जाते. या बीचला ब्ल्यू फ्लॅग बीच (Blue Flag Beach) म्हणून सर्टिफिकेशन मिळाले आहे.
Radhanagar Beach Blue Flag Beach In India : जगातल्या सर्वात सुंदर बीच पैकी एक असलेले अंदमान आणि निकोबार प्रदेशातील राधानगर बीच हे त्याच्या निळेशार स्वच्छ पाणी, पांढरीशुभ्र वाळू, जगातील सर्वात स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांपैकी एक असलेले बीच म्हणून प्रसिद्ध आहे.
अतुलनीय निसर्गसौंदर्य असलेले हे बीच (Radhanagar Beach) जगातील सातव्या क्रमांकाचे सर्वात सुंदर बीच म्हणून ओळखले जाते. या बीचला ब्ल्यू फ्लॅग बीच (Blue Flag Beach) म्हणून सर्टिफिकेशन मिळाले आहे. नुकताच भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतातील ब्लू फ्लॅग बीचेसपैकी राधानगर बीचचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. समुद्रकिना-याच्या प्रेमींसाठी एक नयनरम्य आश्रयस्थान बनण्याचे वचन देणाऱ्या या सुंदर समुद्रकिनाऱ्याच्या विलक्षण सौंदर्यात मग्न व्हा! असे कॅप्शन देत माहिती व प्रसारण मंत्रालयाने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
ब्ल्यू फ्लॅग बीच म्हणजे काय? (Blue Flag Beach)
ब्ल्यू फ्लॅग बीच हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असलेले इको-लेबल आहे जे 33 निकषांवर आधारित आहे. हे निकष 4 प्रमुख श्रेणींमध्ये विभागलेले आहेत. पर्यावरण शिक्षण आणि माहिती, आंघोळीच्या पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण व्यवस्थापन व समुद्रकिनाऱ्याचे संरक्षण आणि सुरक्षा सेवा हे त्यापैकी चार मुख्य निकष आहेत.
ब्लू फ्लॅग किनारे जगातील सर्वात स्वच्छ समुद्रकिनारे मानले जातात. हे एक इको-टुरिझम मॉडेल आहे जे पर्यटक किंवा समुद्रकिनारी जाणाऱ्यांना स्वच्छ आंघोळीचे पाणी, इतर सुविधा, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण आणि परिसराचा शाश्वत विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
राधानगर बीच हे भारतातील ब्ल्यू फ्लॅग बीच पैकी एक मानले जाते. याशिवाय भारतात शिवराजपूर (गुजरात),घोघला (दमण आणि दीव), कासारकोड (कर्नाटक),पादुबिद्री समुद्रकिनारा (कर्नाटक), कपाड (केरळ), रुशीकोंडा (आंध्र प्रदेश), गोल्डन बीच (ओडिशा), कोवलम (तामिळनाडू)व ईडन (पुडुचेरी) या समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग बीचचे प्रमाणपत्र मिळाले आहे.
राधानगर, आशियातील सर्वात सुंदर समुद्रकिनारा
अंदमान व निकोबार प्रदेशातील राधानगर बीच हे हॅवलॉक बेटावर आहे जे आता स्वराज द्वीप म्हणून ओळखले जाते. येथील सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळचे विहंगम दृश्य पाहण्यासारखे असते. हा आशियातील सर्वात सुंदर समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो. अतुलनीय सौंदर्यामुळे या बीचला दरवषी हजारो पर्यटक भेट देतात. टाईम्स मॅगझिनने याला 'जगातील 7 व्या सर्वोत्तम बीच'चा किताब दिला आहे. राधानगर समुद्रकिनारा हे केवळ हॅवलॉकमधीलच नव्हे तर अंदमानमधील अनेक मुख्य आकर्षणांपैकी एक आहे.
आणखी वाचा -
OMG! बांगड्या विकणाऱ्या महिलेचा Fluent English बोलतानाचा VIDEO VIRAL, युजर्स करताहेत कौतुक
Calcium deficiency: वयाच्या तिशीनंतर महिलांची हाडे होतात कमकुवत, मजबूत हाडांसाठी आहारात हे घ्या