प्रवासानंतर तुमची ट्रॅव्हल बॅग अस्वच्छ आणि मळली असल्यास चिंता करण्याची गरज नाही. कारण घरच्याघरी काही सोप्या ट्रिक्सच्या मदतीने अस्वच्छ झालेली सामानाची बॅग स्वच्छ करु शकता.
Travel Luggage Bag Cleaning Tips : लॉन्ग ट्रिपनंतर आपले शरीर थकण्यासह बॅगही अस्वच्छ होते. यावेळी बॅगवर धूळ-माती चिकटली जाते. अशातच घरी आल्यानंतर अस्वच्छ झालेली ट्रॅव्हल बॅग स्वच्छ करणे कठीण वाटते. प्रवासानंतर मळलेली लगेज बॅग स्वच्छ करण्यासाठी पुढील काही सोप्या ट्रिक्स जाणून घेऊया...
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

ट्रॅव्हल बॅग स्वच्छ करण्यासाठी लागणारी सामग्री
- गरम पाणी
- लिक्विड डिटर्जेंट
- मऊ ब्रश अथवा टुथब्रश
- टूथपेस्ट
- सुती कापड
- रिकामी केलेली ट्रॅव्हल बॅग

बाहेरचा भाग स्वच्छ करा
- ट्रॅव्हल बॅग स्वच्छ करण्यासाठी याचा बाहेरील भाग सर्वप्रथम स्वच्छ करा.
- सुती कापड हलका ओलसर करत पुसून घ्या. यासाठी साबणाचे पाणी वापरा.
- बॅगच्या मळलेल्या ठिकाणी व्यवस्थितीत पुसून घ्या.
- बॅगवरील अस्वच्छ डाग निघत नसल्यास मऊ ब्रशने घासून पाहा.
- अखेर बॅग व्यवस्थितीत पुसून घ्या.
बॅगच्या आतमधील स्वच्छता
- बॅगच्या आतमधील भाग स्वच्छ करण्यासाठी वॅक्यूम क्लिनरची मदत घेऊ शकता. यामुळे धूळ आणि माती निघून जाईल.
- बॅगेवर डाग लागला असल्यास तो काढण्यासाठी शॅम्पूचा वापर करू शकता.
- शॅम्पूचे पाण्यात मिक्स करुन त्यामध्ये कापड ओलसर करुन घ्या.
- ओलसर कापडाने बॅग आतमधून व्यवस्थितीत पुसून घ्या.
- अखेर बॅग वाळण्यासाठी उन्हात ठेवून द्या.
बॅगवरील डाग निघतच नसल्यास
- ट्रॅव्हल बॅगमध्ये एखादी क्रिम अथवा तेलाचा डाग लागला असल्यास तो काढण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करू शकता.
- लिंबूचा रस डाग लागेल्या ठिकाणी 10-15 मिनिटे ठेवून द्या.
- तरीही डाग जात नसल्यास त्यावर ब्लिचिंग पावडरचा वापर करा.
- ब्लिचिंग पावडरवर टुथब्रशचा वापर करून स्वच्छ करा.
आणखी वाचा :
केवळ 10 मिनिटांमध्ये Eyebrow Makeup करण्यासाठी 6 सोप्या टिप्स
