शेताच्या बांधावर अथवा शेतामध्ये आपण पिंपळाचे एकतरी वृक्ष असल्याचे पाहतो. पिंपळ महावृक्ष असल्याने त्याची मूळ जमिनीत सर्वत्र पसरलेली असतात.
गावात दोन-तीन पिंपळ असल्यास हवा शुद्ध होते असे म्हटले जाते. याशिवाय पिंपळाच्या झाडातून मिळणाऱ्या ऑक्सिजनमुळे मनात सकारात्मकता निर्माण होते.
पिंपळाला गणपतीच्या 21 पत्रींमध्ये महत्वाचे स्थान आहे.
पिंपळाच्या वृक्षाला अश्वत्थाची उपमा दिल्याने त्याला वृक्षांमधील देव म्हटले जाते.
गावाकडच्या चावडीकडे पिंपळाचे वृक्ष लावण्याची प्रथा होती.
पिंपळाच्या ओल्या सालीचा ज्यूस प्यायल्याने शरिराला बल मिळते.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.