सार
तुम्हाला नवा धमाकेदार स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे. सॅमसंग कंपनीचे दोन 5G स्मार्टफोनच्या किंमती कमी झाल्या आहेत. याबद्दल जाणून घेऊया अधिक...
Samsung Smartphone : सॅमसंग कंपनीने आपले दोन 5G स्मार्टफोनच्या किंमतीत कमी केल्या आहेत. भारतात Samsung Galaxy M14 5G आणि Galaxy F14 5G स्मार्टफोनच्या किंमतीवर तुम्हाला भरघोस सूट मिळणार आहे. यामुळे तुम्हाला सॅमसंग कंपनीचे हे स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, सॅमसंग कंपनीची अधिकृत वेबसाइटसह ऑफलाइन स्टोअरमध्ये देखील खरेदी करता येणार आहे. सॅमसंग कंपनीने Samsung Galaxy M14 5G आणि Galaxy F14 5G स्मार्टफोन 2 हजार 500 रूपयांपर्यंत स्वस्त केले आहेत.
Samsung Galaxy M14 5G
सॅमसंग कंपनीचा Galaxy M14 5G स्मार्टफोनच्या 4GB+128GB व्हेरिएंटला कंपनीने 13 हजार 490 रूपयांत लाँच केले होते. पण कंपनीने याची किंमत एक हजार रूपयांनी कमी केली आहे. यामुळे स्मार्टफोन तुम्हाला 12 हजार 490 रूपयांना खरेदी करता येणार आहे. याशिवाय Galaxy M14 च्या 6GB+128GB स्मार्टफोन 14 हजार 990 रूपयांऐवजी 13 हजार 990 रूपयांना खरेदी करता येणार आहे.
Samsung Galaxy F14 5G
सॅमसंग Galaxy F14 च्या 4GB/128GB व्हेरिएंटला 14 हजार 490 रूपयांत लाँच केले होते. पण तुम्हाला स्मार्टफोन 2 हजार 500 रूपयांच्या सूटसह 11 हजार 990 रूपयांना खरेदी करता येणार आहेय याशिवाय Galaxy F14 च्या 6GB/128Gb स्मार्टफोनला 15 हजार 990 रूपयांत लाँच करण्यात आले होते. पण स्मार्टफोनची किंमत कमी झाल्यानंतर 13 हजार 490 रूपयांना खरेदी करता येऊ शकतो.
Samsung Galaxy F14 5G स्मार्टफोनचे फीचर्स
- डिस्प्ले : 90Hz रिफ्रेश रेटसोबत 6.6 इंचाचा FHD+IPS LCD , कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 लेअर आणि सेल्फी स्नॅपर ठेवण्यासाठी वॉटरड्रॉप नॉच दिले आहे.
- बॅटरी : 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAhची बॅटरी मिळणार आहे.
- प्रोसेसर : ग्राफिक्ससाठी Exynos 1330 Socला माली-G68 MP2 GPU सोबत जोडले आहे.
- स्टोरेज : 4GB LPDDR4x रॅम आणि 64GB/128GB स्टोरेज, जो माइक्रोएसडीसोबत 1TB पर्यंत वाढवला जाऊ शकतो.
- कॅमेरा : 50MP प्रायमरी कॅमेरा, 2MP डेप्थ सेंसर आणि 2MP मॅक्रो सेंसर मिळणार आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी पुढील बाजूस 13MPचा स्नॅपर आहे.
Samsung Galaxy F14 5G फीचर्स
- डिस्प्ले : 6.6 इंचाचा FHD+इन्फिनिटी-V LCD स्क्रीन 90Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसोबत येणार आहे.
- प्रोसेसर : माली-G68 एमपी2 जीपीयूसोबत Exynos 13350 5nm प्रोसेसर मिळणार आहे.
- स्टोरेज : 4GB/6GB LPDDR4x रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज, जो माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवता येऊ शकतो.
- कॅमेरा : 50MP प्रायमरी सेंसर, 2MP डेप्थ आणि 2MP मॅक्रो सेंसर मिळणार आहे. 13MPचा फ्रंट कॅमेरा देखील मिळणार आहे.
- बॅटरी : स्मार्टफोनसाठी 25W फास्ट चार्जिंगसोबत 6000mAhची बॅटरी मिळणार आहे.
आणखी वाचा :
कमी बजेटमध्ये नवा फोन खरेदी करायचाय? Xiaomiच्या या तीन स्मार्टफोनचे पर्याय आहेत बेस्ट
WhatsApp वापरताना ही चूक करणे टाळा, नाहीतर बँक खाते होईल रिकामे