सार
Tecno कंपनीने आणखी एक स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. Pop सीरिजमधील Techno Pop 8 स्मार्टफोनसाठी कंपनीने काय फीचर्स दिले आहेत आणि किंमती किती? याबद्दल जाणून घेऊया अधिक....
Tecno Pop 8 Launch : तुमच्या खिशाला परवडेल असा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. Techno कंपनीने Pop 8 स्मार्टफोन लाँच केला आहे. टेक्नो कंपनीचा Pop 8 स्मार्टफोन गेल्या वर्षात (2023) ग्लोबल मार्केटमध्ये ऑक्टोंबर महिन्यात झळकवण्यात आला होता. भारतात टेक्नो कंपनीचा स्मार्टफोन ग्लोबल व्हेरिएंट फिचर्ससोबत लाँच करण्यात आला आहे. फोनची किंमत 7 हजार रूपयांपेक्षा कमी आहे.
Techno Pop 8 फोनमध्ये युजर्सला 5000mAh ची बॅटरी, 10W वायर्ड चार्जिंग सारखे फिचर्स मिळणार आहेत. याशिवाय फोनमध्ये डायनॅमिक आयलँड डिस्प्ले दिला असून याचा लुक आयफोन 15 प्रो सारखा आहे. टेक्नो कंपनीच्या Pop 8 स्मार्टफोनची किंमत ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर पाहू शकता.
Techno Pop 8 स्मार्टफोनची किंमत
टेक्नोच्या Pop 8 स्मार्टफोन एकाच स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये तुम्हाला 4GB RAM आणि 64GM इंटरनल स्टोरेज सपोर्ट दिला गेला आहे. फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला 6 हजार 499 रूपयांना खरेदी करता येणार आहे. टेक्नोचा Pop 8 फोन दोन रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. या फोनचा पहिला सेल ई-कॉमर्स वेबसाइट Amazon Indiaवर येत्या 9 जानेवारी (2024) सकाळी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे.
Techno Pop 8 स्मार्टफोनचे फीचर्स
- स्मार्टफोनमध्ये 6.65 इंचाचा HD+ डॉट-इन डिस्प्ले दिला आहे. फोनच्या डिस्प्लेचे रेजोल्यूशन 1612 X 720 पिक्सल असून तो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
- टेक्नो पॉप 8 फोनमध्ये आयफोनसारखेच डायनॅमिक आयलँड डिझाइन दिले असून तेथे तुम्हाला फोनवर आलेले नोटिफिकेशन पाहाता येणार आहेत. फोनच्या प्रोटेक्शनसाठी पांडा ग्लास दिला आहे.
- फोनमध्ये Unisoc T606 प्रोसेसर दिला आहे. याशिवाय 4GB LPDDR4X RAM आणि 64GB UFS 2.2 इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट मिळणार आहे. फोनचा रॅम 4GB पर्यंत व्हर्च्युअली वाढवता येऊ शकतो.
- स्मार्टफोन Android 13 Go वर आधारित असून HiOS 13 वर काम करतो. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G VoLTE, Wi-Fi 802.11, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, USB Type C सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
- Techno Pop 8 स्मार्टफोनसाठी 5000mAh च्या बॅटरीसह 10W वायर्ड चार्जिंग सपोर्ट दिला आहे. फोनच्या सुरक्षिततेसाठी साइड माउंटेड फिजिकल फिंगप्रिंट सेंसर मिळणार आहे.
- टेक्नो कंपनीचा हा स्मार्टफोन डुअल कॅमेरा सेटअपसह येणार आहे. यामध्ये 12MP चा प्रायमरी आणि एक AI कॅमेरा दिला आहे. याशिवाय फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅश लाइटही मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 8MP चा कॅमेरा मिळणार आहे.
आणखी वाचा :
तुम्ही Jio, Airtel युजर्स आहात? पाहू शकता फुकटात नेटफ्लिक्स
Asus ROG Phone 8 सीरिज लवकर होणार लाँच, हे धमाकेदार फिचर्स मिळण्याची शक्यता
नवीन वर्षात लाँच होणार हे 5 धमाकेदार स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स