Lifestyle

Technology

WhatsApp वापरताना ही चूक करणे टाळा, नाहीतर बँक खाते होईल रिकामे

Image credits: freepik

स्क्रीन शेअरिंग फीचर

व्हॉट्सअ‍ॅपने यंदाच्या वर्षात स्क्रीन शेअरिंग फीचर लाँच केले आहे. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या फोनची स्क्रीन दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करू शकता. 

Image credits: freepik

अज्ञात व्यक्तीसोबत स्क्रीन शेअरिंग

स्क्रीन शेअरिंग फीचरमुळे तुम्हाला दुसऱ्या युजरच्या फोनच्या स्क्रीनचा अ‍ॅक्सेस मिळेल. पण एखाद्या अज्ञात व्यक्तीसोबत या फीचरचा वापर करणे तुम्हाला महागात पडू शकते.

Image credits: freepik

ऑनलाइन फसवणूक

स्क्रीन शेअरिंग फीचरमुळे ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांना कोणत्याही ओटीपीची गरज भासणार नाही. ते सहज तुमच्या बँक खात्यातून पैसे लंपास करू शकतात.

Image credits: freepik

स्क्रीन शेअर करताना विचार करा

आतापर्यंत बहुतांशजणांना स्क्रीन शेअरिंग फीचरच्या माध्यमातून फसवल्याची प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे या फीचरचा वापर करताना विचारपूर्वक करा.

Image credits: freepik

व्हिडीओ कॉल

तुमची ऑनलाइन फसवणूक होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. खरंतर अज्ञात क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडीओ कॉल किंवा फोन आल्यास तो उचलू नका.

Image credits: freepik

स्क्रीन शेअरिंग फीचरचा वापर

अज्ञात व्यक्तीने फोनमधील स्क्रीन शेअरिंगचा पर्याय सुरू करण्यास सांगितल्यास तसे करू नका. याशिवाय समोरच्या व्यक्तीने स्क्रीन शेअरिंगची रिक्वेस्ट पाठवली तरीही ती स्विकारू नका.

Image credits: Freepik

फोनचा पासवर्ड

तुम्ही चुकूनही स्क्रीन शेअरिंग फीचर सुरू केले असल्यास फसवणूकदार तुमचा फोन पूर्णपणे कंट्रोल करू शकतो. याशिवाय तुमच्या फोनचा पासवर्ड आणि ओटीपीही सहज मिळवू शकतो.

Image credits: freepik

संवेदनशील माहिती शेअर करणे

तुम्ही कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत बँक खाते क्रमांक, आपला पासवर्ड, क्रेडिट-डेबिट कार्ड आणि ओटीपी संबंधित माहिती देणे टाळा. अन्यथा तुमची ऑनलाइन फसवणूक होऊ शकते.

Image credits: freepik