कमी बजेटमध्ये नवा फोन खरेदी करायचाय? Xiaomiच्या या तीन स्मार्टफोनचे पर्याय आहेत बेस्ट

| Published : Jan 06 2024, 01:44 PM IST

Redmi Note 13 Series

सार

तुम्हाला कमी बजेटमध्ये नवा फोन खरेदी करायचाय का? तर Xiaomi कंपनीने भारतात नुकत्याच Redmi Note 13 5G Series लाँच केली आहे. याबद्दलच जाणून घेऊया अधिक....

Budget Friendly Smartphones : Redmi Note 13 5G सीरिज भारतात नुकतीच लाँच करण्यात आली आहे. या सीरिजअंतर्गत Redmi Note 13 5G, Note 13 Pro 5G आणि Note 13 Pro+ 5G सारखे मॉडेल्स लाँच करण्यात आले आहेत. अशातच तुम्ही खिशाला परवडणाऱ्या किंमतीत नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय तर या फोनबद्दल जाणून घ्या अधिक...

Redmi Note 13 5G स्मार्टफोनच्या 6GB+128 व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 7 हजार 999 रूपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय Redmi Note 13 Pro 5G फोनच्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत 25 हजार 999 रूपये आहे. अशाप्रकारेच Redmi Note 13 Pro+ स्मार्टफोनच्या 8GB+256GB व्हेरियंटसाठी तुम्हाला 31 हजार 999 रूपये खर्च करावे लागणार आहेत.

ग्राहकांना येत्या 10 जानेवारीपासून शाओमी कंपनीची अधिकृत वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि रिटेल आउटलेटमधून फोन खरेदी करता येणार आहे. याव्यतिरिक्त ग्राहकांना बँक ऑफर्स आणि एक्सचेंज बोनसही दिला जाणार आहे.

Redmi Note 13 5G स्मार्टफोन फीचर्स
डुअल सिमकार्ड दिल्या गेलेल्या Redmi Note 13 5G स्मार्टफोनसाठी 120Hz रिफ्रेश रेट दिला असून 13 आधारित MIUI 14वर काम करतो. याशिवाय फोनसाठी 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले दिला गेला आहे. यामध्ये 12GB पर्यंत रॅमसह 6nm MediaTek Dimensity 6080 प्रोसेसर दिला आहे.

फोटोग्राफीसाठी फोनच्या पुढील बाजूस 108MPचा कॅमेरा आणि 2MP डेप्श सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यामध्ये 16Mpचा कॅमेरा आहे. Redmi Note 13 5G स्मार्टफोनसाठी 5000mAhच्या बॅटरीसह 33W फास्ट चार्जिंग दिले आहे.

दोन्ही Redmi Note 13 Pro 5G आणि Note 13 Pro+ 5G फोनसाठीचे काही फीचर्स हे स्टँण्डर्ड मॉडेल प्रमाणे आहे. प्रो मॉडेल्समध्ये 6.67 इंचाचा Curved AMOLED डिस्प्ले दिला आहे. याशिवाय Redmi Note 13 Pro 5Gमध्ये Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर तर Note 13 Pro+ मध्ये Dimensity 7200-Ultra प्रोसेसर देण्यात आला आहे. या दोन्ही स्मार्टफोनसाठी 12GB पर्यंत रॅम दिला गेला आहे.

Redmi Note 13 Pro 5G आणि Note 13 Pro+ 5G स्मार्टफोनसाठी 200MPचा प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2MPचा मॅक्रो कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी यामध्येही 16MP चा कॅमेरा दिला आहे.

Redmi Note 13 Pro 5Gची बॅटरी 5100mAhची असून 6W चार्जिंग दिला आहे. याशिवाय Note 13 Pro+ची बॅटरी 5000mAh असून त्याला 120W फास्ट चार्जिंग दिला आहे.

आणखी वाचा : 

WhatsApp वापरताना ही चूक करणे टाळा, नाहीतर बँक खाते होईल रिकामे

Tecno Pop 8 स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमतीसह फीचर्स

Asus ROG Phone 8 सीरिज लवकर होणार लाँच, हे धमाकेदार फिचर्स मिळण्याची शक्यता

Top Stories