सार

Nail Care Tips:हातांची नखं सुंदर दिसण्यासाठी नखांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ज्या लोकांच्या डाएटमध्ये पुरेशा प्रमाणात पोषण तत्त्वे असतात त्यांची नखं चमकादार आणि सुंदर दिसतात. सुंदर नखांसाठी कसा असावा पौष्टिक आहार हे जाणून घेऊयात सविस्तर...

Nail Care Tips: आपण त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी काही प्रकारच्या ब्युटी ट्रिटमेंट्स करतो. त्याचप्रमाणे नखांच्या सौंदर्याकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे असते. काही महिलांची नखे छान वाढतात. पण काही वेळेस ती तुटतात किंवा कोरडी पडतात. या समस्येपासून दूर राहण्यासाठी महिला मेनिक्युअर आणि पेडिक्युअर करतात. तरीही नखं मजबूत आणि चमकदार दिसत नाहीत. 

खरंतर आपण सुदृढ राहण्यासाठी ज्या प्रकारे हेल्दी आहाराचे सेवन करतो. तसेच नखांच्या सौंदर्यासाठी देखील काही व्हिटॅमिन आणि खनिजांची गरज असते. याचबद्दल जाणून घेऊया अधिक...

व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठीच्या आवश्यक पोषण तत्त्वांपैकी एक आहे. कोलेजनच्या निर्मितीसाठी 'व्हिटॅमिन सी'ची आवश्यकता असते. दात, डोळे आणि नखांसाठी कोलेजन अत्यंत फायदेशीर असते. नखांच्या सौंदर्यासाठी तुम्ही संत्रे, लिंबू, टोमॅटो आणि व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा.

बायोटिन व्हिटॅमिन
बायोटिन व्हिटॅमिनमुळे शरीरातील पेशींमध्ये वाढ होते. बायोटिन हे त्वचेसह नखांसाठी देखील फायदेशीर असते. आहारातून अ‍मिनो अ‍ॅसिडचे ग्रहण करण्यासाठी बायोटिन मदत करते. याशिवाय नखं लवकर तुटण्याची समस्याही यामुळे कमी होते. अंडी, दूध,पनीर, कोबीमधून शरीरात बायोटिनची पुर्तता होऊ शकते.

लोह
शरीरातील लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी लोहाची आवश्यकता असते. या रक्तपेशींच्या माध्यमातून संपूर्ण शरीराच्या अवयवयांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यास अवयवयांपर्यंत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचले जात नाही. यामुळे शरीरातील अवयवयांसंदर्भातील समस्या उद्भवतात. त्याचप्रमाणे लोहाच्या कमतरतेमुळे नखांवर देखील परिणाम होतो.

मॅग्नेशिअम
मॅग्नेशिअममुळे नखांची उत्तम वाढ होते. पण नखांवर लांब रेषा दिसत असल्यास तर समजून जा शरीरात मॅग्नेशिअमची कमतरता आहे. यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, शेंगदाणे, काजू, बदाम याचे सेवन करावे. 

प्रोटीन
नखांची वाढ ही कॅराटिन (Keratin protein) नावाच्या एका तंतुमय प्रोटीनपासून होते. यामुळे नखे मजबूत होतात. नखांच्या वाढीसाठी प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करावे असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. यासाठी तुम्ही सोयाबिन, डाळ, नट्स याचा आहारात समावेश करावा.

ओमेगा-3
ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन12 देखील नखांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे. संतुलित आहाराच्या सेवनाने नखांच्या समस्येपासून दूर राहता येते. पुरेशा प्रमाणात पोषण तत्त्वे नखांना मिळाल्यास नखं सुंदर आणि हेल्दी राहतात.

तज्ज्ञांचा सल्ला
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा: 

Skin Care : तुमची त्वचा पिवळसर झालीय? असू शकते हे गंभीर कारण, जाणून घ्या उपाय

Health Care: शरीरातील व्हिटॅमिन बी-5 ची कमतरता दूर करतील हे फूड्स

Beauty: चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी या हिरव्यागार भाजीचा करा वापर