Lifestyle

Beauty

चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी या हिरव्यागार भाजीचा करा वापर

Image credits: Getty

गुणकारी पालक

पालक ही भाजी आरोग्यवर्धक तसेच सौंदर्यवर्धकही आहे. पालकचा आपण ब्युटी केअर रुटीनमध्येही समावेश करू शकता.

Image credits: Getty

औषधी घटकांचा स्त्रोत

पालकचा वापर करून चेहऱ्याचे सौंदर्य कसे खुलवू शकता? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credits: Getty

सौंदर्यवर्धक पालक

पालकमधील पोषकघटकांमुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते. यामध्ये व्हिटॅमिन A, C, K, B1, B2, B6, लोह, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, फॉलेट, ओमेगा 3 फॅटी अॅसिड यासारख्या घटकांचा समावेश आहे.

Image credits: Getty

मुरुमांची समस्या

 त्वचा तेलकट असल्यास मुरुमांच्या समस्येचा सामना करावा लागतो. पालकमधील औषधी तत्त्वांमुळे त्वचेवर जमा झालेली घाण व तेलाच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

Image credits: Getty

सूर्याची हानिकारक किरणे

 पालकमध्ये व्हिटॅमिन B असते, त्यामुळे त्वचेचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होण्यास मदत मिळते. सन बर्न, वृद्धत्वाची लक्षणे, डागांची समस्याही कमी होऊ शकते.

Image credits: Getty

वृद्धत्वाची लक्षणे

पालकमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत. ज्यामुळे वृद्धांची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते. पालकच्या सेवनामुळे त्वचेवर नॅचरल ग्लो येतो.

Image credits: Getty

नॅचरल ग्लो

 तेलकट तसेच कोरड्या त्वचेसाठीही पालक लाभदायक आहे. यातील व्हिटॅमिन K व फॉलेट घटकामुळे काळे डाग, मुरुम कमी होण्यास मदत मिळते.चेहऱ्यावर तेजही येते.

Image credits: Getty

पालक फेस पॅक

पालकचे सेवन करण्याव्यतिरिक्त आपण त्याची पेस्ट तयार करूनही चेहऱ्यावर लावू शकता. पेस्टमध्ये गुलाब पाणी, मध मिक्स करा व चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटांनी चेहर स्वच्छ करावा.

Image credits: Getty

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty