सार

Skin Care: त्वचेचे वेगवेगळे प्रकार असतात. काहीजणींची त्वचा अधिक तेलकट, कोरडी अथवा कॉम्बिनेशन (Combination) म्हणजेच कोरडी आणि तेलकट मिक्स असते. पण तुम्ही कधी सेलो स्किनबद्दल कधी ऐकले आहे का? जाणून घेऊया सविस्तर...

Cello Skin Care: आपण चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंटची मदत घेतो. पण काहीजणींची नेहमीच अशी तक्रार असते, त्वचेसाठी कितीही काही उपाय केले तरीही त्वचा उजळ होत नाही. पण तुम्ही कधी सेलो स्किनबद्दल (Cello Skin) ऐकले आहे का? खरंतर आपल्या त्वचेचा नैसर्गिक रंग बदलून त्वचा पिवळी अथवा तपकिरी होण्याला 'सेलो स्किन' असे म्हटले जाते. याचा परिणाम खासकरून चेहऱ्यावरील त्वचेवर दिसतो.

सेलो स्किनमध्ये त्वचा तपकिरी अथवा पिवळी होण्यासह चेहऱ्यावर डाग येणे, त्वचा कोरडी होणे, चेहऱ्याचा रंग बदलणेही सेलो स्किनची लक्षणे आहेत. सेलो स्किनमागे काही कारणे देखील असू शकतात. यावर नक्की उपाय काय? याबद्दल अधिक जाणून घेऊया…

पोषण तत्त्वांची कमतरता
सेलो स्किनचे सर्वाधिक मोठे कारण बिघडलेली लाइफस्टाइल आणि अनहेल्दी पदार्थ. शरीराला पुरेशा प्रमाणात पोषण तत्त्वे न मिळाल्यास सेलो स्किनची समस्या निर्माण होऊ शकते. खरंतर त्वचेवरील पेशींच्या आरोग्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी शरीराला व्हिटॅमिन व खनिजांची गरज असते. ज्यावेळी त्वचेला पुरेशा प्रमाणात आवश्यक पोषण तत्त्वे मिळत नाहीत त्यावेळेस त्वचेचा रंग गडद झाल्यासारखा दिसतो. अशातच गरजेचे आहे, आहारात व्हिटॅमिन ए, बी-12, सी, ई, के सारख्या पोषण तत्त्वांचा समावेश केला पाहिजे. 

अ‍ॅनिमिया
अ‍ॅनिमियाच्या कारणास्तव सेलो स्किनची समस्या निर्माण होऊ शकते. लाल रक्तपेशी शरीरातील पेशी आणि ऊतींना ऑक्सिजन पोहोचवण्याचे कार्य करतात. रक्तातील लाल पेशी कमी झाल्यास अ‍ॅनिमियाची समस्या निर्माण होते. याशिवाय शरीरातील पेशींना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन न मिळाल्यास त्वचेचा रंग गडद होऊ लागतो. तसेच तणाव, पुरेशी झोप न मिळाल्यानेही त्वचेचा रंग गडद होते. अ‍ॅनिमियाची समस्या दूर करण्यासाठी डाएटमध्ये लोह, व्हिटॅमिन बी-12 चे सेवन करावे. यासाठी पालक, भोपळ्याच्या बिया, डार्क चॉकलेट खाऊ शकता.

तणाव, धूम्रपान आणि अपुरी झोप
धूम्रपान आरोग्यासाठी नुकसानदायक असते. पण धूम्रपान करणे त्वचेसाठी देखील धोकादायक आहे. धूम्रपानाच्या सवयीमुळे चेहऱ्यावर अँटी-वृद्धत्वाची लक्षणे दिसून येतात. याशिवाय धूम्रपानामुळे त्वचेमधील कोलेजनचे उत्पादन कमी होते आणि ट्रोपोएलास्टिन (tropoelastin), मॅट्रिक्स मेटालोप्रोटीनेसिसचे(matrix metalloproteinases) त्वचेमधील उत्पादन वाढले जाते. जे मॅट्रिक्स प्रोटीन (Matrix Protein) व फायबरला नुकसान पोहोचवते. याच कारणास्तव सेलो स्किनची समस्या होऊ लागते.

घरगुती उपाय

  • दिवसातून कमीतकमी दोन वेळेस चेहरा व्यवस्थितीत धुवावा
  • केमिकल-फ्री फेसवॉशचा वापर करा
  • आठवड्यातून दोनदा चेहऱ्याची त्वचा एक्सफोलिएट करा
  • त्वचेला मॉइश्चराइझर लावा
  • घरात असतानाही देखील सनस्क्रिन लावा
  • त्वचेला व्हिटॅमिन-सी सीरम लावा
  • त्वचा हायड्रेट राहण्यासाठी भरपूर पाणी प्या

तज्ज्ञांचा सल्ला
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा: 

Health Tips: सकाळच्या वॉकनंतर करू नका या चुका

Pedicure At Home : ब्युटीपार्लरसारखे पेडिक्युअर घरीच करायचंय? फॉलो करा या STEPS

इन्फ्लूएंझा किंवा सीझनल फ्लूची लक्षणे आढळल्यास काय करावे व काय करू नये?