सार
Lemon Coriander Soup Recipe : थंडीच्या दिवसात घरच्याघरी हेल्दी आणि पौष्टिक असे कोरिअन्डर सूप कसे तयार करायचे याची रेसिपी जाणून घेऊया…
Lemon Coriander Soup Recipe in Marathi : घरच्याघरी रेस्टॉरंटसारखे कोरिअन्डर सूप तयार करायचे असल्यास याची रेसिपी आज पाहणार आहोत. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया…
साहित्य :
- 1 चमचा लिंबाचा रस
- 1/4 कप बारीक चिरलेली कोथिंबीर
- 1 चमचा कॉर्न फ्लोअर
- 1/2 चमचा मीठ
- 1 वाटी गाजर
- 1 वाटी बारीक चिरलेली फरसबी
- 1 वाटी बारीक चिरलेला कोबी
- अर्धा चमचा बारीक चिरलेले आलं
- अर्धाचमचा बारीक चिरलेले लसूण
- एक चमचा बटर किंवा तेल
- अर्धा चमचा काळी मिरी पावडर
कृती
- सर्वप्रथम सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरुन घ्या
- कॉर्न फ्लोअरमध्ये पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा.
- गॅसवर पॅनमध्ये तेल किंवा बटर घालून त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर भाज्या घालून परतून घ्या. यामध्ये लिंबाचा रस आणि कोथिंबीरही मिक्स करा.
- गॅसवर दुसऱ्या बाजूला एका भांड्यात पाणी गरम करत ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर सूपच्या मिश्रणात मिक्स करुन घ्या.
- सूपच्या पातळ मिश्रणात कॉर्न फ्लोअरची घट्ट पेस्ट मिक्स करा. जेणेकरुन सूप थोडं घट्ट होईल. सूप उकळताना सातत्याने ढवळत रहा.
- सूप 5 मिनिटे उकळवून घेतल्यानंतर त्यावरुन काळी मिरी पावडर घालून पिण्यासाठी सर्व्ह करा.
आणखी वाचा :