हाडांच्या बळकटीसाठी ते केसांसाठी फायदेशीर आहे गूळ, फायदे
Lifestyle Dec 09 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Freepik
Marathi
आरोग्यासाठी फायदेशीर गूळ
गुळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे बद्धकोष्ठता, हाडांना बळकटी मिळणे ते केसांसाठी फायदेशीर असते.
Image credits: Freepik
Marathi
गुळामधील पोषण तत्त्वे
गुळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरससह अन्य काही पोषण तत्त्वे असतात. जाणून घेऊया थंडीच्या दिवसात दररोज गुळाचे सेवन करण्याचे फायदे पुढे…
Image credits: Freepik
Marathi
रोगप्रतिकारक शक्ती वाढेल
दररोज गुळाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल.
Image credits: Social media
Marathi
पचनक्रियेसाठी बेस्ट
गुळाचे दररोज सेवन केल्यास त्यामधील पोषण तत्त्वांमुळे बद्धकोष्ठता, अपचन आणि पोटातील गॅसची समस्या दूर होण्यास मदत होईल.
Image credits: social media
Marathi
हाडांसाठी फायदेशीर
गुळामधील कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम अशा पोषण तत्त्वांमुळे हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते.
Image credits: social media
Marathi
केसांसाठी फायदेशीर
गुळ आणि हलीमचे एकत्रित सेवन केल्याने काही आरोग्यदायी फायदे होतात. याशिवाय केसांचे आरोग्यही राखले जाते.
Image credits: Pinterest
Marathi
पीसीओडीच्या समस्येवर फायदेशीर
गुळ आणि धण्याचे सेवन केल्याने मासिक पाळी आणि पीसीओडीच्या संबंधित समस्या कमी होऊ शकते.
Image credits: Social media
Marathi
वजन कमी होण्यास मदत
दररोज गुळाचे सेवन केल्याने शरिरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत होते. यामुळे मेटाबॉलिज्मची प्रक्रिया वेगाने होण्यास मदत होते. यामुळे वजन कमी होते.
Image credits: Social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.