सार

बहुतांशजण पोटावरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. तरीही पोटावरील चरबी कमी होत नाही. यामागे काही कारणे असू शकतात. पण तुम्ही लाइफस्टाइलमध्ये थोडा बदल केल्यास नक्कीच पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होईल.

5 Ways to Lose Belly Fat : पोटावरील वाढत्या चरबीने सर्वांचे टेंन्शन वाढवले आहे. भारतासह संपूर्ण जगभरातील नागरिक वाढत्या वजनामुळेही चिंतेत आहेत. अत्याधिक वजन आणि वाढलेल्या पोटामुळे काही गंभीर आजार मागे लागू शकतात. यामुळे हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करण्याचा नेहमीच सल्ला दिला जातो. जेणेकरुन तुम्ही वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तंदुरुस्तही राहू शकता.

काहीजण असा विचार करतात की, वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाऊन व्यायाम करावा. खूप वेळ जिममध्ये घाम गाळूनही वजन काही कमी होत नाही. अशातच दररोजच्या काही सवयींमध्ये बदल केल्यास नक्कीच पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते. याबद्दलच्या खास टिप्स जाणून घेऊया सविस्तर....

हेल्दी डाएट आणि व्यायाम
वजन कमी करण्यासाटी सर्वप्रथम डाएटकडे लक्ष दिले पाहिजे. यामध्ये 75 टक्के भूमिका डाएटची असते. अशातच डाएटमध्ये हेल्दी फळ, भाज्या, लीन प्रोटीनचा समावेश करावा. साखर, मैद्याचे पदार्थ, पाकिटबंद पदार्थ खाणे टाळावे. हेल्दी फॅट्स डाएटमध्ये सहभागी करण्यासाठी ड्राय फ्रुट्स, ऑलिव्ह ऑइल आणि सॉल्यूबल फायबरचे सेवन करावे. याशिवाय दररोज अर्धा तास तरी व्यायाम करावा. जेणेकरुन पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होईल.

जेवणाची योग्य पद्धत
काहीजण अशी तक्रार करतात की, डाएट फॉलो करुनही वजन कमी होत नाही. यामागील कारण म्हणजे तुमची जेवणाची पद्धत फार महत्त्वाची असते. डाएट करताना सर्वप्रथम मर्यादित प्रमाणात काही गोष्टींचे सेवन करणे अत्यावश्यक असते. याशिवाय खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थितीत चावून खावेत. जेणेकरुन पचण्यासही मदत होईल. याव्यतिरिक्त जेवताना कोणत्याही प्रकारची स्क्रिन सुरू ठेवू नये. ज्यावेळी तुम्ही फोन किंवा टीव्ही सुरू ठेवून अन्नपदार्थ खाता तेव्हा ओव्हर इटिंग करण्याची शक्यता वाढली जाते.

मर्यादित वेळेनुसार फूड्सचे सेवन करा
बहुतांशजण काम पूर्ण करण्यासाठी खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात. असे करण्याची चूक करू नका. ज्यावेळी तुम्ही दोन मील्समध्ये अधिक वेळाचा गॅप ठेवता त्यामुळे फूड क्रेविंग्स वाढल्या जातात. अशातच तुम्ही गरजेपेक्षा अधिक फूड्स खाता. 

भरपूर प्रमाणात पाण्याचे सेवन करा
हेल्दी डाएटसह पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन करणे देखील फार महत्त्वाचे आहे. काहीजण पाण्याचे कमी सेवन केल्याने त्यांची भूकही वाढली जाऊ शकते. अशातच अत्याधिक फूड्सचे सेवन केल्याने वजन वाढले जाते. यामुळे लाइफस्टाइलमध्ये बदल करण्यासह तुमच्यासोबत एक पाण्याची बॉटल नक्की ठेवा. पाण्याएवजी तुम्ही फळांचा ज्यूस अथवा पाणीदार फळांचे सेवनही करू शकता.

लहान-लहान गोष्टींमध्ये करा बदल
पोटावरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी आपल्या लाइफस्टाइलमध्ये बदल करणे अत्यावश्यक आहे. जसे की, ऑफिसमध्ये लिफ्ट एवजी पायऱ्यांचा वापर करावा, दीर्घकाळ बसून काम करायचे असल्यास त्यादरम्यान काही वेळासाठी ब्रेक घ्यावा. असे काही सोपे बदल करुनही तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकता.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Kitchen Hacks : कैरी-पुदिन्याची चटणी तयार केल्यानंतर काळी पडते? ट्राय करा ही ट्रिक

दररोज अंडी खाल्ल्यास आरोग्यावर होतो परिणाम? जाणून घ्या सविस्तर