Lifestyle

दररोज अंडी खाल्ल्यास आरोग्यावर होतो परिणाम? जाणून घ्या सविस्तर

Image credits: social media

पोषण तत्त्वे भरपूर असतात

अंड्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स (जसे बी12, राइबोफ्लेविन आणि फोलेट) आणि खनिजांचा उत्तम स्रोत असतो.

Image credits: social media

वजन कमी करण्यास फायदेशीर

उच्च प्रमाणात अंड्यात प्रोटीन असल्याने दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. अशातच दिवसभरात कमी कॅलरीजचे सेवन केले जाते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

Image credits: social media

शरिराला उर्जा मिळते

दररोज अंड्याचे सेवन केल्याने शरिराला उर्जा मिळते. जरी तुम्ही दुपारचे जेवण केले नाही तरीही सकाळी नाश्ताला खालेल्ल्या अंड्यामुळे पोट भरलेले राहते.

Image credits: social media

मूड राहतो उत्तम

अंड्यामध्ये ओमेगा-3 असते, यामुळे मूड उत्तम राहण्यास मदत होते. बहुतांशजणांना सकाळच्या नाश्तामध्ये अंड्याचे सेवन करणे फार आवडते.

Image credits: Getty

हृदयाचे आरोग्यासाठी फायदेशीर

संशोधनातून समोर आलेय की, अंड्यामध्ये असलेले कोलेस्ट्रॉल व्यक्तीच्या शरिरातील ब्लड कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढण्यास प्रभावित करत नाही.

Image credits: Getty

अ‍ॅलर्जी

ज्या व्यक्तींना अ‍ॅलर्जीची समस्या असते त्यांनी दररोज अंड्याचे सेवन करणे टाळावे. अन्यथा अ‍ॅलर्जीची समस्या अधिक वाढू शकते.

Image credits: Getty

भाज्या किंवा मल्टीग्रेनचा वापर

अंड्यामध्ये फायबर आणि कार्बोहाइड्रेट नसतात. यामुळे अंड्यासोबत भाज्या आणि मल्टीग्रेन टोस्टचे सेवन करू शकता.

Image credits: Getty

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty