Kitchen Hacks : कैरी-पुदिन्याची चटणी तयार केल्यानंतर काळी पडते? ट्राय करा ही ट्रिक

| Published : May 25 2024, 02:08 PM IST

How-to-make-perfect-keri-and-pudina-chutney
Kitchen Hacks : कैरी-पुदिन्याची चटणी तयार केल्यानंतर काळी पडते? ट्राय करा ही ट्रिक
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

उन्हाळ्याच्या दिवसात कैरी आणि पुदीन्याची चटणीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पण बहुतांशवेळा चटणी तयार केल्यानंतर काळी पडते. यावर उपाय काय याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

Kitchen Hacks : उन्हाळ्याच्या दिवसात वरण भात अथवा चपातीसोबत कैरी-पुदिन्याची चटणी बेस्ट फूड कॉम्बिनेशन मानले जाते. पण बहुतांश महिलांना असा प्रश्न पडतो की, कैरी-पुदिन्याची चटणी तयार केल्यानंतर काही वेळाने काळी पडते. अशातच यावर उपाय काय असू शकतो याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...

कैरी-पुदीना चटणी तयार करण्यासाठी सामग्री

  • एक कैरी
  • एक कप पुदीन्याची पाने
  • दीड कप कोथिंबीर
  • 1-2 हिरवी मिरची
  • एक चमचा जीरे
  • दीड चमचा लिंबूचा रस
  • चवीनुसार मीठ
  • एक लहान तुकडा आलं
  • आवश्यकतेनुसार पाणी

अशी तयार करा चटणी

  • सर्वप्रथम कैरीची साल काढून त्याचे लहान-लहान तुकडे कापून घ्या.
  • पुदिना आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या.
  • हिरवी मिरची आणि आलं मोठ्या आकारात कापून घ्या
  • मिक्सरच्या भांड्यात कैरीचे तुकडे, आलं, कोथिंबीर, पुदीना, हिरव्या मिरची, जीरे आणि एक चिमुटभर मीठा टाकून सर्व सामग्री वाटून घ्या.
  • कैरी-पुदीन्याची चटणी काळी पडण्यापासून दूर राहण्यासाठी यामध्ये चार बर्फाचे तुकडे आणि अर्धा चमचा लिंबूचा रस मिक्स करा. असे केल्याने चटणीचा रंग गडद हिरवा होईल.
  • सर्व सामग्री व्यवस्थित मिक्सरमध्ये व्यवस्थितीत वाटून घेतल्यानंतर यामध्ये पुन्हा लिंबाचा रस आणि साखर मिक्स करा.
  • चटणी टेस्ट करुन पाहा आणि चवीनुसार मीठ, साखर आणि लिंबाचा रसही पुन्हा मिक्स करा.
  • चटणी एका डब्यात भरुन ठेवून 10 दिवसपर्यंत वापरु शकता.

आणखी वाचा : 

दररोज अंडी खाल्ल्यास आरोग्यावर होतो परिणाम? जाणून घ्या सविस्तर

बच्चेकंपनीसाठी बटाट्यापासून बनवा या 6 सोप्या रेसिपी, होतील खुश