सार

Fitness Tips: सध्या बदललेल्या लाइफस्टाइलमुळे बहुतांशजणांना वजन वाढणे, लठ्ठपणा अशा समस्यांचा सामना करावा लागतो. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. तरीही वजन कमी होत नाही? यासाठी तुम्ही अतिरिक्त व्यायाम करता का? जाणून घेऊया याबद्दल सविस्तर...

Risk of Over Exercising: कोरोना महामारीदरम्यान लावण्यात आलेल्या लॉकडाउन आणि वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे बहुतांश लोकांचे वजन वाढले गेले. आजही वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. खरंतर वाढलेल्या वजनामागील कारणे वेगवेगळी असू शकतात. पण तुम्ही वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइझ करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. याशिवाय फिटनेससाठी ओव्हर एक्सरसाइझ करता का? 

फिटनेससाठी हेल्दी डाएटसोबत दररोज एक्सरसाइझ करणे गरजेचे आहे. पण विचार न करता तुम्ही एक्सरसाइझ केल्यास आरोग्याचे नुकसान होऊ शकते. ओव्हर एक्सरसाइझ केल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात याबद्दल जाणून घेऊया अधिक...

कार्डियक अरेस्ट
ओव्हर एक्सरसाइझ करणे अशा लोकांसाठी धोकादायक आहे ज्यांनी नव्याने व्यायाम करण्यास सुरुवात केली आहे. कोणालाही न विचारता स्वत:हून कोणताही व्यायाम करण्यास सुरुवात करू नका. अन्यथा हृदयावर अधिक ताण पडल्यास कार्डिअ‍ॅक अरेस्ट (Cardiac Arrest)ची समस्या उद्भवू शकते.

पाठीच्या मणक्याचा त्रास
तुम्ही पाहिले असेल काही लोक जिममध्ये वेट ट्रेनिंगदरम्यान जड वजन उचलतात. या एक्सरसाइजदरम्यान पाठीचे पोश्चर व्यवस्थितीत नसल्यास पाठीच्या कण्याला नुकसान पोहोचू शकते. ज्याला, प्रोलॅप्सड इंटरर्टेब्रल डिस्क (Prolapsed Intervertebral Disc) असे म्हटले जाते. तसेच ओव्हर एक्सरसाइज केल्यानेही पाठीच्या कण्यावर अधिक भार पडल्याने त्यासंबंधित त्रास उद्भवू शकतो.

ब्रेनहॅमरेजची (Brain Hemorrhage) समस्या
सर्वसामान्यपणे जे लोक लठ्ठ असतात ते ओव्हर एक्सरसाइज करतात. कारण लवकरात लवकर वजनी कमी होईल या आशेने ते ओव्हर एक्सरसाइज करतात. पण ओव्हर एक्सरसाइझ करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. शरीरातील स्नायूंवर अतिरिक्त भार पडल्यास आरोग्यासंबंधित वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात. तसेच ओव्हर एक्सरसाइझमुळे ब्रेनहॅमरेजची समस्या निर्माण होऊ शकते. ब्रेनहॅमरेजमध्ये मेंदूच्या रक्तवाहिन्या फुटतात आणि मेंदूच्या आसपास रक्तस्राव होऊ लागतो.

क्षमतेनुसार करा एक्सरसाइज
काही लोक हा विचार करतात, एक तासाऐवजी चार तास एक्सरसाइज केल्यास त्यांना अधिक फायदा होईल. पण हा विचार करणे पूर्णपणे चुकीचे आहे. याला यू-कर्व्ह ऑफ एक्सरसाइज असे म्हटले जाते. याचा अर्थ होतो, एका मर्यादित वेळापर्यंत एक्सरसाइझ करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण ओव्हर एक्सरसाइझ करत असल्यास फायद्याऐवजी आरोग्याचे नुकसानच होऊ शकते.

जिम ट्रेनरची मदत घ्या
फिटनेसाठी एक्सरसाइझ करणे आरोग्यासाठी फायदेशीरच असते. पण कोणतेही कठीण किंवा नवी एक्सरसाइझ करताना जिम ट्रेनरची मदत घ्या. प्रत्येक एक्सरसाइझनंतर काही मिनिटांचा ब्रेक घ्या. जेणेकरून हृदयावर त्याचा अधिक भार पडला जाणार नाही.

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा: 

थंडीत दररोज 1 हिरवी मिरची खाण्याचे होतात हे फायदे

Health Advice: सावधान! वारंवार साबणाने हात धुताय? होऊ शकतो त्वचेचा हा गंभीर आजार

Health Tips: सकाळच्या वॉकनंतर करू नका या चुका