थंडीत दररोज 1 हिरवी मिरची खाण्याचे होतात हे फायदे
हिरवी मिरची पदार्थांची चव वाढवण्यासह आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, लोह, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम सारखी पोषण तत्त्वे असतात.
हिवाळ्यात दररोज एक हिरवी मिरची खाण्याचे फायदे माहितेय का? जाणून घेऊया सविस्तर...
हिरव्या मिरचीतील कॅप्साइसिन नावाच्या कंपाउंडमध्ये अँटी-डायबेटिक गुणधर्म असतात. जे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
हिरव्या मिरचीत अँटी-ओबेसिटी गुणधर्म असतात. जे फॅट बर्न करण्यास मदत करू शकतात. याचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील चरबी कमी होऊ शकते.
दररोज एका मिरचीचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारली जाते. याशिवाय गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.
मिरचीत कॅप्साइसिनसह काही प्रकारच्या कंपाउंडमुळे हृदयरोगाच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत होते. लक्षात ठेवा, हिरव्या मिरचीचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.
हिरव्या मिरचीत व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. यामध्ये बीटा-कॅरोटिन गुणधर्म असतात. याच्या सेवनाने त्वचेला नॅचरल ग्लो येतो आणि सुरकुत्यांची समस्याही दूर होते.
हिरव्या मिर्चीत कॅप्सेसिन नावाच्या कंपाउंडमुळे दुखण्याच्या समस्येपासून दूर राहता. याचे सेवन केल्याने अर्थराइटिस सारख्या दुखण्यापासूनही आराम मिळतो.
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.