2026 मध्ये Apple चा मोठा धमाका, iPhone Fold सह 6 दमदार गॅझेट्स होणार लॉन्च
6 major Apple gadgets launching in 2026 : 2026 हे वर्ष अॅपल प्रेमींसाठी खूप आनंदाचे असणार आहे. इतिहासातील पहिल्या फोल्डेबल आयफोनसह सहा प्रमुख डिव्हाइसेस 2026 मध्ये अॅपलकडून लाँच होण्याची शक्यता आहे.

आयफोन फोल्ड
2026 मध्ये अॅपलचे भवितव्य हा फोल्डेबल स्मार्टफोन ठरवेल. आयफोन फोल्ड हा अॅपलच्या इतिहासातील पहिला फोल्डेबल फोन आहे. यात A20 प्रो चिप, 7.8-इंचाचा इनर स्क्रीन आणि 6.5-इंचाचा कव्हर डिस्प्ले असण्याची शक्यता आहे.
आयफोन 17e
आयफोन सीरिजमधील बजेट-फ्रेंडली मॉडेल म्हणून हा फोन ओळखला जातो. आयफोन 17e फेब्रुवारी 2026 मध्ये लाँच होऊ शकतो. हा फोन नवीन A19 चिपसह येईल अशी अपेक्षा आहे.
आयफोन 18 प्रो, आयफोन 18 प्रो मॅक्स
रिपोर्ट्सनुसार, 2026 मध्ये आयफोन 18 लाइनअपमध्ये आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स सादर केले जातील. हे दोन्ही फोन नवीन A20 प्रो चिपसह येतील.
मॅकबुक प्रो M5 प्रो, M5 मॅक्स
M5 प्रो चिपसह मॅकबुक प्रो आणि M5 मॅक्स चिपसह आयपॅड प्रो पुढील वर्षी लाँच होण्याची शक्यता आहे. हे दोन्ही डिव्हाइस 2026 च्या सुरुवातीला सादर केले जातील. M5 मॅकबुक प्रोमध्ये मोठ्या बदलाची अपेक्षा नाही.
मॅकबुक एअर M5
पुढील वर्षी मॅकबुक एअरला M5 चिप मिळेल. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, हे M5 मॅकबुक प्रो 2026 च्या पहिल्या तिमाहीत लाँच होईल. मॅकबुक एअर M4 च्या किमतीत फारसा बदल होण्याची शक्यता नाही.
OLED आयपॅड मिनी
OLED डिस्प्लेसह येणारा हा पुढचा आयपॅड असेल. रिपोर्ट्सनुसार, आयपॅड मिनी 8 मोठ्या अपग्रेडसह 2026 च्या तिसऱ्या तिमाहीत लाँच होईल. यात आयफोन 17 प्रो मॉडेल्समधील A19 प्रो चिप वापरली जाण्याची शक्यता आहे. 60Hz रिफ्रेश रेटमध्ये कोणताही बदल होणार नाही.

