सकाळच्या वेळेस चालणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे आरोग्यासंबंधित उद्भवणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. याशिवाय तणावही कमी होतो.
Image credits: Getty
Marathi
थकवा दूर होतो
सकाळी वॉक केल्याने शरीरातील थकवा आणि आळस दूर होतो. तसेच शरीर हेल्दी आणि अॅक्टिव्ह राहण्यास मदत होते.
Image credits: Getty
Marathi
या चुका करणे टाळा
सकाळी वॉक केल्यानंतर पुढील काही चुका करणे टाळल्या पाहिजेत.
Image credits: Getty
Marathi
अत्याधिक खाणे
सकाळच्या वेळेस वॉक केल्यानंतर अत्याधिक खाणे टाळले पाहिजे. सकाळी अत्याधिक खाल्ल्याने दिवसभरासाठी लागणारा उत्साह कमी होतो व पुन्हा थकल्यासारखे जाणवत राहते.
Image credits: Getty
Marathi
पाणी पिणे
सकाळी वॉक केल्यानंतर गरजेपेक्षा अधिक पाणी पिणे टाळा. यामुळे पोट भरल्यासारखे राहते व काही खाण्याचे मन होत नाही. पण पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने हायड्रेट राहता.
Image credits: Getty
Marathi
स्ट्रेचिंग एक्सरसाइज
सकाळी वॉक केल्यानंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा. यामुळे शरीरातील स्नायूंना आराम मिळतो. चालल्यानंतर लगेच झोपल्यास शरीर दुखण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
Image credits: Getty
Marathi
प्रोटीन शेक
सकाळच्या वॉकमुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार प्रोटीन व केळ्याचा शेक पिऊ शकता. यामुळे शरीरात उर्जा टिकून राहते.
Image credits: Getty
Marathi
दिवसभराचे नियोजन
सकाळच्या वॉकनंतर दिवसभराचे नियोजन केले पाहिजे. यामुळे संपूर्ण दिवसभरात कोणती कामे करायची आहेत याचा अंदाज येईल. याशिवाय काम करताना उत्साही देखील रहाल.
Image credits: Getty
Marathi
हेल्दी डाएट
सकाळच्या वॉकनंतर नेहमीच हेल्दी पदार्थ खावेत. यासाठी फळं व ज्युसचा समावेश आपल्या डाएटमध्ये करावा. यामुळे शरीराला महत्त्वाची पोषण तत्त्वे मिळतील.
Image credits: Getty
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.