Christmas 2023 : ख्रिसमस ट्रीवर पायमोजे लावण्यामागे हे आहे खास कारण, जाणून घ्या

| Published : Dec 15 2023, 02:27 PM IST / Updated: Dec 15 2023, 05:17 PM IST

Christmas 2023
Christmas 2023 : ख्रिसमस ट्रीवर पायमोजे लावण्यामागे हे आहे खास कारण, जाणून घ्या
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Christmas Celebration : नाताळ सण हा फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्त घरात चविष्ट पदार्थ बनवण्यापासून ते घराची रोषणाई केली जाते. पण ख्रिसमस ट्रीबद्दलच्या काही खास गोष्टी तुम्हाला माहितेयत का? जाणून घेऊया याबद्दल सविस्तर...

Christmas 2023 : नाताळ सण प्रत्येक वर्षी 25 डिसेंबरला साजरा केला जातो. नाताळ सण हा आनंदाचा, उत्साहाचा असतो. डिसेंबर महिना सुरू झाल्यानंतर बहुतांशजण नाताळ सणासाठी तयारी सुरू करतात. बहुतांशजण नाताळसाठी आपल्या घराला सजावट करतात. पण ख्रिसमस ट्री सजवताना पायमोजे, मेणबत्ती, भेटवस्तू अशा वस्तू वापरण्यामागील नक्की कारण माहितेय का?

ख्रिसमस ट्री
ख्रिसमस ट्री शिवाय नाताळचा सण अपूर्ण आहे. अशी मान्यता आहे की, ख्रिसमस ट्री हे आनंदाचे प्रतीक आहे. यामुळे घरातील नकारात्मक उर्जा दूर होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नाताळ सणावेळी ख्रिसमस ट्री सजवल्याने मुलांचे आयुष्य वाढले जाते हे मानले जाते.

केक
नाताळ सणावेळी ख्रिस्ती बांधवांच्या घरी केक तयार करण्याची फार जुनी परंपरा आहे. घरी तयार करण्यात आलेला केक मित्रपरिवार, नातेवाईकांना देत नाताळ सणाचा आनंद लुटला जातो. अशी मान्यता आहे की, तणाव आणि नैराश्य दूर करण्यासाठी केक तयार केला जातो.

भेटवस्तू
नाताळ सणानिमित्त एकमेकांना खास भेटवस्तू दिल्या जातात. यामुळे नातेसंबंध टिकून राहतात. तसेच या दिवशी गरजूंना कपडे, मिठाई देत नाताळचा सण साजरा केला जातो.

मेणबत्त्या
नाताळ सणावेळी मेणबत्त्या लावून आयुष्यातील दु:खाचा अंध:कार दूर करत सुखाचा प्रकाश येऊ दे अशी प्रार्थना करतात. वेगवेगळ्या रंगातील मेणबत्त्या पेटवल्याने आयुष्यात आनंद येतो अशी देखील मान्यता आहे.

बेल (Bell)
ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी बेलचा वापर हमखास केला जातो. बेलबद्दल अशी मान्यता आहे की, ख्रिसमस ट्रीवर घंटी लावल्याने नकारात्मक उर्जा दूर होते. परंपरेनुसार, नाताळ सणावेळी बेल वाजवून प्रभू येशूचा वाढदिवस साजरा केला जातो.

पायमोजा
ख्रिसमस ट्रीवर पायमोजे देखील लावले जातात. यामागे एक कथा आहे. खरंतर एका गरीब व्यक्तीकडे आपल्या मुलींचे लग्न करण्यासाठी पैसे नव्हते. सॅन्ट निकोलस (Saint Nicholas), ज्याला आपण सांताक्लॉज (Santa Claus) म्हणतो त्याने सोन्याने भरलेली एक पोटली त्या व्यक्तीच्या घरातील किचनमध्ये टाकली. ती पोटली किचनजवळ लावण्यात आलेल्या पायमोजामध्ये जाऊन पडली. तेव्हापासून ख्रिसमस ट्रीवर पायमोजा लावला जातो.

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा: 

Chanakya Niti : नशीबवान लोकांनाच मिळतात अशा प्रकारची 5 सुख

Mehndi Tips: मेंदी काढण्यापूर्वी हातावर लावा ही गोष्ट, अधिक गडद होईल रंग

Plants for Good Luck : नव्या वर्षात सुख-समृद्धी मिळवण्यासाठी घरात लावा हे रोप