सार

Fashion :  प्रत्येक महिलेला हातापायावर मेंदी काढायला आवडते. यामुळे हाताचे सौंदर्य अधिक खुलले जाते. पण बहुतांशवेळेस मेंदी काढल्यानंतर ती अधिक रंगत नाही अशी तक्रार काहीजणी करतात. मेंदी काढण्यापूर्वी हाताला नक्की काय लावावे याबद्दल जाणून घेऊया अधिक...

Mehndi Tips: सणासुदीचे दिवस असो किंवा लग्नसोहळा, प्रत्येक महिलेला हातावर मेंदी काढणे फार आवडते. खरंतर मेंदी काढणे शुभ मानले जाते. पण मार्केटमधून मेंदीचा कोन खरेदी करण्याएवजी तुम्ही घरच्या घरी देखील तयार करू शकता. घरी मेंदी तयार करताना त्यामध्ये काही नैसर्गिक वस्तूंचा वापर करू शकता.

हातावरील मेंदीचा रंग अधिक गडद होण्यासाठी नक्की काय करावे हे कळत नाही? यासाठी पुढील काही टिप्स फॉलो करू शकता.

मेंदी काढण्यापूर्वी करा हे काम
आपण मेंदी काढतो पण त्याचा रंग अधिक गडद होत नाही. यासाठी तुम्हाला थोडी मेहनत करावी लागले. फार काही करावे लागणार नाही पुढील गोष्टी केवळ लक्षात ठेवा.

नीलगिरीचे तेल
नीलगिरीच्या तेलामुळे ऊब निर्माण होते, ज्यामुळे मेंदीचा रंग गडद होण्यास मदत मिळते. अशातच मेंदी काढण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून त्यावर नीलगिरीचे तेल लावा.

काही लोक लवंगाचे तेलही लावतात. पण मेंदी पूर्ण काढून झाल्यानंतर लवंगाचे तेल लावल्यास ते अधिक फायदेशीर ठरू शकते. लक्षात ठेवा, राईचे तेल किंवा अन्य कोणतेही तेल हाताला मेंदी काढण्यापूर्वी लावू नका. यामुळे मेंदीचा रंग फिकट होऊ शकतो.

मॉइश्चराइझर
ज्यावेळी मेंदी काढता त्याआधी हातांवर कोणत्याही प्रकारची घट्ट ब्युटी क्रिम अथवा मॉइश्चराइझर अजिबात लावू नका. यामुळे मेंदीचा रंग गडद होणार नाही. मेंदी लावण्यापूर्वी हात अधिक तेलकट नसावेत याची देखील काळजी घ्यावी.

या टिप्स करा फॉलो
तव्यावर लवंग गरम करा. लवंग गरम करताना त्यामधून निघणाऱ्या धुरावर मेंदी लावलेले हात धरा. यामुळे मेंदीचा रंग गडद होण्यास मदत होईल. याशिवाय मेंदी काढून झाल्यास लिंबूपाणी देखील हातांना लावू शकता. लिंबूपाण्यामुळे मेंदीचा रंग गडद होण्यासह दीर्घकाळ हातावर टिकून राहिल. पण लक्षात ठेवा, लिंबूपाणी मेंदीसाठी वापरताना लिंबाच्या रसाचे काही थेंबच वापरा. अन्यथा मेंदीचा रंग फिकट होऊ शकतो.

मेंदीचे हात धुतल्यानंतर
मेंदीचा रंग गडद झाला नसल्यास यासाठी एखादा वेदना कमी करणारा बाम लावू शकता. बाम हातांना लावून ठेवल्यानंतर काही तासांनी मेंदीचा रंग गडद होऊ शकतो. केमिकलयुक्त मेंदीचा वापर करताना कोणत्याही प्रकारचा बाम हाताला लावू नका. यामुळे त्वचेवर अ‍ॅलर्जीची समस्या निर्माण होऊ शकते.

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा: 

Lip Care Tips: काळवंडलेल्या ओठांमुळे बिघडतंय तुमचे सौंदर्य? करा हे नैसर्गिक उपाय

Feet Care Tips: फ्लॅट फुटवेअर वापरताय? तुमच्या आरोग्यावर होताहेत इतके गंभीर दुष्परिणाम

Old Towel Reuse: जुन्या टॉवेलपासून अशी तयार करा स्टायलिश बॅग