- Home
- lifestyle
- Bedroom Deep Cleaning : बेडरुमची डीप क्लिनिंग करण्यासाठी या सोप्या टिप्स नक्की ट्राय करा
Bedroom Deep Cleaning : बेडरुमची डीप क्लिनिंग करण्यासाठी या सोप्या टिप्स नक्की ट्राय करा
बेडरूम वरून कितीही स्वच्छ दिसत असली, तरी तिथे न दिसणारी धूळ आणि जंतू साचलेले असतात. यामुळे खोलीत कुबट वास येतो. आठवड्यातून एकदा बेडशीट धुणे आणि गादी उन्हात वाळवणे, यासारख्या ५ सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमची बेडरूम एकदम स्वच्छ ठेवू शकता.

बेडवर असणारे न दिसणारे जंतू
आपण रोज सकाळी उठल्यावर बेडशीट झटकतो आणि उशा नीट लावतो. बेड आवरलेला दिसला की आपल्याला वाटते खोली स्वच्छ आहे. पण प्रत्यक्षात बेडवरच सर्वात जास्त धूळ, घाम आणि डेड सेल्स असतात. फक्त बेडशीट बदलून ही घाण जात नाही. यामुळे खोलीत कुबट वास येतो.
या घाणीमुळे ॲलर्जी, नाक चोंदणे, खाज सुटणे आणि झोप न लागणे अशा समस्या निर्माण होतात. तज्ज्ञांच्या मते, रोजच्या झाडझुडपीसोबतच आठवड्यातून एकदा बेडरूमचे 'डीप क्लिनिंग' करणे गरजेचे आहे. यासाठी जास्त वेळ लागत नाही, फक्त ३०-४० मिनिटांत तुम्ही ही ५ कामे सहज करू शकता.

१. सर्वात आधी बेडपासून सुरुवात करा
आठवड्यातून एकदा बेडशीट आणि उशीचे कव्हर गरम पाण्यात धुवा. व्हॅक्यूम क्लिनरने गादी चांगली स्वच्छ करा. व्हॅक्यूम क्लिनर नसेल, तर गादी आणि उशा दोन तास उन्हात ठेवा. यामुळे डस्ट माइट्स मरून जातात.
२. पडदे आणि खिडक्या
बेडरूममधील पडद्यांवर खूप धूळ साचते. आठवड्यातून एकदा ते झटकून काढा किंवा व्हॅक्यूम करा. खिडकीचे ग्रिल्स आणि स्लाइडिंग डोअरच्या फटी ओल्या ब्रशने साफ करा. आरसा किंवा ड्रेसिंग टेबल पुसल्यास खोली लगेच चमकू लागते.
३. इलेक्ट्रॉनिक वस्तू
एसी, फॅनची पाती आणि ट्यूबलाइटवर साचलेली धूळ खोलीतच फिरत असते. आठवड्यातून एकदा फॅनची पाती सुक्या कापडाने पुसून घ्या. साइड टेबल, कपाटाचा वरचा भाग आणि स्विच बोर्डवर डिसइन्फेक्टंट स्प्रे मारून ते स्वच्छ करा.
४. पलंगाखालची जागाही स्वच्छ करा
पलंगाखाली, कपाटाच्या मागे आणि खिडकीच्या कोपऱ्यांमध्ये सर्वात जास्त धूळ साचते. आपण या जागा रोज झाडत नाही. त्यामुळे आठवड्यातून एकदा ओल्या कापडाने किंवा मॉपने हे कोपरे पुसून घ्या. पलंगाखाली अनावश्यक वस्तू ठेवू नका. यामुळे हवा खेळती राहते. नाहीतर तिथे खूप दुर्गंधी येते आणि डास जमा होतात. म्हणूनच पलंग आणि सोफ्याचे कोपरे शक्य तितके स्वच्छ ठेवा.

