MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Gas Stove Cleaning : गॅसचे काळे पडलेले बर्नर नव्यासारखे चमकवायचेत? या 3 सोप्या टिप्स नक्की ट्राय करा

Gas Stove Cleaning : गॅसचे काळे पडलेले बर्नर नव्यासारखे चमकवायचेत? या 3 सोप्या टिप्स नक्की ट्राय करा

गॅस शेगडीच्या बर्नरवर साचलेला तेलकटपणा आणि काळे डाग तुम्ही घरातीलच काही वस्तू वापरून सहज काढू शकता. बर्नर नव्यासारखे कसे चमकवायचे, याच्या सोप्या टिप्स.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 27 2026, 12:47 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
कसा साफ कराल गॅस, बर्नर
Image Credit : AI

कसा साफ कराल गॅस, बर्नर

गॅस शेगडीच्या बर्नरवर तेल आणि अन्नाचे कण साचून ते काळे पडतात. ही स्वयंपाकघरातील एक अतिशय सामान्य समस्या आहे. यामुळे गॅसची ज्योत पिवळी पडते, काही भागातूनच जाळ येतो किंवा गॅसचा वेग कमी होतो. ही समस्या सोडवण्यासाठी तुम्ही घरातील व्हिनेगर, बेकिंग सोडा, लिंबू आणि डिशवॉश लिक्विडचा सहज वापर करू शकता.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
घरगुती उपाय नक्की ट्राय करा
Image Credit : Gemini

घरगुती उपाय नक्की ट्राय करा

बर्नरवरील चिकट डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस खूप फायदेशीर ठरतो. तुम्ही दोन चमचे बेकिंग सोड्यात गरजेनुसार लिंबाचा रस मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट डाग पडलेल्या बर्नरवर लावा आणि १५ ते २० मिनिटे तशीच राहू द्या. त्यानंतर जुना टूथब्रश किंवा मऊ स्क्रबरने बर्नर हलक्या हाताने घासा. घरात उरलेली लिंबाची साल असेल, तर तिनेही तुम्ही हे डाग घासू शकता. बर्नर जास्त जोरात घासू नका, नाहीतर त्यावर ओरखडे पडू शकतात.

Related Articles

Related image1
Best Pressure Cooker : कुकर घेताय? ॲल्युमिनियम की स्टील, कोणता बेस्ट? आधी हे नक्की वाचा
34
हट्टी डागांवर उपाय
Image Credit : Gemini

हट्टी डागांवर उपाय

डाग खूपच हट्टी असतील, तर तुम्ही व्हिनेगर आणि गरम पाण्याचा वापर करू शकता. गॅस बंद करा आणि बर्नर पूर्णपणे थंड झाल्यावरच ते बाहेर काढा. एका भांड्यात समप्रमाणात गरम पाणी आणि व्हिनेगर घ्या. त्यात बर्नर काही तास भिजत ठेवा. डागांच्या स्वरूपानुसार तुम्ही वेळ वाढवू शकता. यामुळे बर्नरच्या छोट्या छिद्रांमध्ये अडकलेले तेल आणि घाण सहज निघून जाते. रोजच्या वापरातील हलकी घाण काढण्यासाठी गरम पाण्यात थोडे डिशवॉश लिक्विड टाकून बर्नर २० ते ३० मिनिटे भिजत ठेवा. यामुळे अन्नाचे कण सहज निघून जातील.

44
बर्नर ब्लॉक होण्यापासून वाचेल
Image Credit : Gemini

बर्नर ब्लॉक होण्यापासून वाचेल

भिजवलेले बर्नर तुम्ही नायलॉन स्क्रबर किंवा मऊ ब्रशने घासून स्वच्छ करू शकता. धातूचे कडक स्क्रबर वापरणे पूर्णपणे टाळा. धुतलेले बर्नर पूर्णपणे सुकल्यानंतरच पुन्हा गॅस शेगडीवर बसवा. ओले बर्नर चुकूनही वापरू नका. बर्नरच्या छिद्रांमध्ये अडकलेली घाण काढण्यासाठी सुईसारख्या टोकदार वस्तूने छिद्रे मोठी करणे धोकादायक ठरू शकते. बर्नर स्वच्छ करूनही गॅसची ज्योत नीट येत नसेल, तर स्वतः प्रयोग करण्यापेक्षा तज्ज्ञांना बोलावणे शहाणपणाचे ठरते. स्वयंपाक झाल्यावर शेगडी थंड होताच सांडलेले अन्न लगेच पुसून घेतल्यास बर्नर वारंवार ब्लॉक होण्यापासून वाचवता येते.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Joint Pain Relief Foods : सांधेदुखीचा त्रास कमी करायचाय? मग हे 7 पदार्थ नक्की खा
Recommended image2
Expiry Date : पूर्वी नव्हती, मग आताच का आली? तारीख उलटली म्हणजे अन्न खरंच खराब होतं का?
Recommended image3
Dandruff Home Remedies : कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी 6 घरगुती उपाय
Recommended image4
Rani Haar : गळाभर राणी हार... लग्नसराईत रॉयल लूकसाठी हे डिझाईन्स नक्की ट्राय करा
Recommended image5
Healthy Foods : '100% नॅचरल'च्या नावाखाली तुम्ही हे 5 घातक पदार्थ तर खात नाही ना?
Related Stories
Recommended image1
Best Pressure Cooker : कुकर घेताय? ॲल्युमिनियम की स्टील, कोणता बेस्ट? आधी हे नक्की वाचा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved