Jaggery Benefits : लाल गूळ की काळा गूळ? आरोग्यासाठी कोणता जास्त चांगला?
घरी कोणताही गोड पदार्थ बनवायचा असेल तर गूळ हा लागतोच. पण... कोणत्या रंगाचा गूळ चांगला? लाल गूळ की काळा? तुम्ही कोणता गूळ खायला हवा..?

कोणता गूळ खावा?
आपल्या भारतीय स्वयंपाकात, विशेषतः पारंपरिक गोड पदार्थांना गुळामुळे एक वेगळीच चव येते. साखरेपेक्षा गूळ खूप आरोग्यदायी आहे, हे आपल्याला माहीतच आहे. पण बाजारात गेल्यावर आपल्याला प्रामुख्याने दोन रंगांचा गूळ दिसतो. एक लाल गूळ, जो थोडा लालसर किंवा सोनेरी रंगाचा असतो; तर दुसरा काळा गूळ, जो गडद रंगाचा असतो.
या दोन्हीत नक्की फरक काय? कोणत्या गुळात जास्त पोषक तत्त्वे असतात? आपल्या आरोग्यासाठी कोणता गूळ सर्वोत्तम आहे?

लाल गूळ आणि यातील फरक..
लाल गूळ..
लाल आणि सोनेरी रंगाचा गूळ सहसा उसाचा रस उकळून बनवला जातो. उसाचा रस कमी वेळ किंवा सामान्य तापमानावर उकळल्यावर हा रंग येतो. हा साधारणपणे लाल किंवा हलका तपकिरी असतो आणि दिसायला आकर्षक असतो. याची चव गोड असते आणि सुगंधही हलका असतो. काही प्रकारच्या लाल गुळामध्ये आकर्षक रंग आणि चमक आणण्यासाठी थोड्या प्रमाणात रसायने किंवा कृत्रिम रंग वापरले जातात.
लाल गूळ: यामध्ये लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी खनिजे असतात. पण, तो बनवताना वापरलेल्या रसायनांमुळे त्यातील पोषक घटक नष्ट होण्याची शक्यता असते.
काळ्या गुळाचा एक प्रकार
काळा गूळ (पाम गूळ)
हा ऊस, ताड किंवा खजुराच्या झाडांपासून मिळणाऱ्या 'नीरा' (नैसर्गिक रस) पासूनही बनवला जातो. कोणत्याही रसायनांचा वापर न करता हा पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने बनवला जातो. रस आंबट होऊ नये म्हणून फक्त नैसर्गिक चुना वापरला जातो. म्हणूनच हा गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाचा असतो.
काळा गूळ: हे पोषक तत्त्वांचे भांडार आहे. यामध्ये लोह, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असते. यामध्ये कोणतीही रासायनिक भेसळ नसल्यामुळे, शरीराला निसर्गाने दिलेली पोषक तत्त्वे पूर्णपणे मिळतात.
दोन्हीपैकी कोणता चांगला?
मधुमेह/वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी: लाल गुळाच्या तुलनेत काळ्या गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे तो खाणे जास्त सुरक्षित असते.
लहान मुले आणि महिलांसाठी: मासिक पाळीचा त्रास असलेल्या आणि लोहाची कमतरता (अॅनिमिया) असलेल्यांसाठी काळ्या गुळातील नैसर्गिक खनिजे खूप फायदेशीर ठरतात.
लाल गूळ दिसायला सुंदर आणि चविष्ट असला तरी, तो बनवताना रसायने वापरण्याची शक्यता असते. दुसरीकडे, काळा गूळ हे कोणत्याही रसायनांविना मिळणारे शुद्ध नैसर्गिक उत्पादन आहे. शक्य असल्यास, रोजच्या आहारात काळ्या गुळाचा (सेंद्रिय गूळ) समावेश करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

