केसांच्या आरोग्यासाठी कढीपत्ता उत्तम काम करतो. अँटी-ऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वे ए, बी, सी, ई असलेला कढीपत्ता केसांना मजबूत बनवतो.
कढीपत्ता हेअर फॉलिकल्स मजबूत करून केस गळणे कमी करतो. तसेच अकाली केस पांढरे होणे थांबवतो आणि कोंडा कमी करतो.
कढीपत्त्याचे तेल नियमितपणे केसांना लावल्यास किंवा कच्चा कढीपत्ता खाल्ल्यास केसांची वाढ सुधारते.
जास्त प्रमाणात असलेले बीटा कॅरोटीन आणि प्रथिने केसांची वाढ वेगाने करतात.
कढीपत्त्यातील जीवनसत्व बी६ केसांच्या मुळांना मजबूत करते आणि केस गळणे लक्षणीयरीत्या कमी करते.
मूठभर कढीपत्त्याची पेस्ट करा. त्यानंतर त्यात दही मिसळून हेअर पॅकसारखे लावा. ३०-४५ मिनिटे ठेवून शॅम्पूने केस धुवा.
केसांच्या पोषणासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी ३-५ कढीपत्त्याची पाने चावून खा. यामुळे केस मजबूत होतात.
कढीपत्ता १० मिनिटे पाण्यात उकळून घ्या. पाणी थंड झाल्यावर त्याने केस धुवा.
Jasmine Care : कुंडीत सहज वाढवता येणाऱ्या मोगऱ्याच्या 4 उत्तम जाती
Ginger Tea : आल्याचा चहा पिल्याने तुमच्यात होतात हे मोठे बदल
Jhumka with Chain : साडीवर रॉयल लूक देणारे झुमका आणि चेन डिझाईन्स
Blood Pressure Control : बीपी नियंत्रित करण्यासाठी 7 पदार्थ