सार

महिला आपले सौंदर्य खुलवण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट आणि महागडे ब्युटी प्रोडक्ट्स वापरतात. तरीही त्वचेवर ग्लो येत नाही. अशातच घरच्याघरी चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी तांदळाचे पीठ फायदेशीर ठरू शकते.

Rice flour for glowing skin : प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावे अशी इच्छा असते. यामुळे वेगवेगळे ब्युटी प्रोडक्ट्स आणि ट्रिटमेंट केल्या जातात. याशिवाय काही महिला पार्लरमध्ये जाऊन फेशियल आणि महागड्या ट्रिटमेंट करतात. पण या ट्रिटमेंटसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रोडक्ट्समध्ये हानिकारक केमिकल असते, जे त्वचेला नुकसान पोहोचवू शकते. अशातच घरच्याघरी चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी तांदळाचे पीठ वापरू शकता. याचा कशाप्रकारे वापर करायचा जाणून घेऊ.या.

तांदळाच्या पीठाचे फायदे

तांदळाच्या पीठामुळे त्वचेवरील डेड स्किन हटवण्यास मदत होते. यामध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि अँटीइंफ्लेमेंटरी गुण असतात, जे पिंपल्स आणि डाग आणि टॅनिंगची समस्या कमी करण्यास मदत करतात. नियमित रुपात चेहऱ्याला तांदळाचे पीठ लावल्यास त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते.

असा करा वापर

तांदळाचे पीठ आणि दूध

चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी तांदळाच्या पीठामध्ये दूध मिक्स करू शकता. खरंतर, दूधामुळे त्वचेला पोषण आणि ओलसरपणा मिळतो. याशिवाय स्किन टोनमध्येही सुधारणा होतो. यासाठी एका वाटीत तांदळाचे पीठ घेऊन त्यामध्ये दूध मिक्स करत घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याच्या त्वचेला 10-15 मिनिटे लावून ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. हा उपाय आठवड्यातून दोन-तीनवेळा करू शकता.

तांदळाचे पीठ आणि टोमॅटोचा रस

तांदळाच्या पीठात टोमटोचा रस मिक्स करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला 15 मिनिटे लावून ठेवल्यानंतर धुवा. यामुळे चेहऱ्यावर आठवड्याभरात ग्लो आल्याचे दिसून येईल. खरतंर, टोमॅटोच्या रसामुळे स्किन टोन सुधारण्यास मदत होते.

तांदळाचे पीठ आणि मध

त्वचेला ग्लो येण्यासाठी तांदळाच्या पीठात मध मिक्स करू शकता. मधामुळे त्वचा कोमल आणि चमकदार होते. याशिवाय डागांची समस्या कमी होते. यासाठी एका वाटीमध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ घेऊन त्यामध्ये एक चमचा मध आणि गुलाब पाणी मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्याला 20 मिनिटे लावून ठेवा.यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)