सार

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. अशातच काहींची त्वचा कोरडी होण्याची समस्या उद्भवली जाते. यामुळे त्वचा काळवंडलेली दिसू लागते. यावर उपाय काय जाणून घेऊया.

Dry Skin Care Tips For Summer : उन्हाळ्यातील कडक ऊन, प्रदूषण आण घामामुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवल्या जाऊ शकतात. यामुळे त्वचेवर चिकटपणा वाढला जातो. तेलकट त्वचा असणाऱ्यांना सीबम आणि चिकटपणामुळे पिंपल्स आणि अ‍ॅक्नेसारख्या समस्या उद्भवतात. मात्र कोरडी त्वचा असणाऱ्यांमध्ये त्वचा खेचल्यासारखी किंवा अत्याधिक कोरडी झाल्याची समस्या उद्भवते. यावेळी त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. यावर उपाय काय जाणून घेऊया.

नारळाचे तेल

त्वचेला मसाज करण्यासाठी नारळाचे तेल बेस्ट पर्याय आहे. यामुळे ब्लड सर्कुलेशन सुधारले जाते आणि त्वचेवर ग्लो येते. इसेंशियल ऑइल आणि नॅच्युरल ऑइलने मसाज केल्याने त्वचेमध्ये ओलसरणा टिकून राहतो. यामुळे त्वचा कोमल होते. उन्हाळ्यात कोरड्या त्वचेच्या मसाजसाठी नारळाच्या तेलाचा वापर करू शकता.

एलोवेरा जेल

उन्हामुळे त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून बाहेरुन आल्यानंतर त्वचेवर एलोवेरा जेल लावा. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि सर्नबनच्या समस्येपासून दूर राहता. उन्हाळ्यात चेहरा धुतल्यनंतर त्वचेवर एलोवेरा जेलचा वापर करू शकता. यामुळे त्वचेवर ग्लो येईल.

बेसन आणि दह्याचा फेस पॅक

दही त्वचेला हाइड्रेट ठेवण्यासह उजळवण्यास मदत करते. तर बेसनाचे पीठ त्वचेवरील डेड सेल्स हटवून फ्रेश लूक देतो. यासाठी 2 चमचे बेसनाच्या पीठात 1 चमचा दही मिक्स करुन फेस पॅक तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्याला 10-15 मिनिटे लावून ठेवा. जेणेकरुन त्वचा एक्सफोलिएट होण्यास मदत होईल.

मधाचा वापर

उन्हाळ्यात कोरड्या त्वचेच्या आरोग्यासाठी मधाचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. यासाठी मधामध्ये दूध मिक्स करुन चेहऱ्याला लावा.

गुलाब पाण्याचा वापर

गुलाब पाणी नॅच्युरल टोनर प्रमाणे वापरले जाते. त्वचेवर गुलाब पाण्याचा वापर केल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि त्वचा फ्रेश दिसते. चेहरा धुताना थोडे गुलाब पाणी त्यामध्ये मिक्स करा. या पाण्याचे चेहरा धुतल्याने कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होईल.

या गोष्टींची घ्या काळजी

उन्हाळ्यात त्वचा हेल्दी राहण्यासाठी ऊन्हात जाणे टाळा. हेल्दी डाएट आणि दिवसभर 2-3 लीटर पाण्याचे सेवन करा. याशिलाय अल्कोहोल आणि कॅफेनचे सेवन करणे टाळा.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)