फेशियल केल्याने चेहऱ्याची चमक वाढली जाते. याशिवाय त्वचेवरील डाग दूर होतात. घरच्याघरी पार्लरसारखा फ्रुट फेशियल कसा करावा जाणून घेऊया.
फेशियल करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा. यासाठी कच्च्या दूधाचा वापर करा.
पुढच्या स्टेपमध्ये चेहरा स्क्रब करा. यासाठी लिंबूची साल आणि डाळीचा वापर करू शकता. दोन्ही गोष्टी एकत्रित करुन पेस्ट तयार करुन चेहऱ्याला 10 मिनिटे लावून ठेवा.
चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी मध 10 मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा. यामुळे स्किन टोन सुधारला जातो.
त्वचेवरील घाण दूर होण्यासाठी आणि पोर्स उघडण्यासाठी चेहऱ्यासाठी वाफ घ्या.
फेशियलसाठी सर्वप्रथम टोमॅटो आणि काकडीची पेस्ट तयार करा. ही पेस्ट 15 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर चेहऱ्याला लावा. यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.