चीनहून कराचीला जाणारे जहाज न्हावाशेवा बंदरात थांबवण्यात आले. त्याचा तपास डीआरडीओने केला आहे.
येत्या 8 मार्चला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा-प्रार्थना केली जाते. पण तुम्हाला ज्योतिर्लिंग आणि शिवलिंगमधील फरक माहितेय का?
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाच्या उत्तर प्रदेशात विस्तार करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी हा विस्तार केला आहे.
निवडणूक आयोगाकडून लवकरच आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. याशिवाय निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान होऊ शकते.
संदेशखळी प्रकरणातील प्रमुख आरोपी शाहजहान शेख याला सीबीआयकडे सोपवले जाणार आहे. त्याच्याविरुद्ध दोन डझनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
‘भारत जोडो न्याय’ यात्रेदरम्यान मध्यप्रदेशातील शाजापुर येथे भाजप (BJP) कार्यक्रत्यांसह नेत्यांनी राहुल गांधींच्या हातात बटाटे दिले. याशिवाय जयश्रीराम आणि मोदींच्या नावे घोषणाही केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेत्री राणी मुखर्जीच्या लुकची बहुतांशवेळा चर्चा केली जाते. खासकरुन राणी मुखर्जी साडी नेसते. तुम्ही चाळशीतील असाल किंवा त्यापेक्षाही अधिक वय असल्यास राणी मुखर्जीसारख्या लाल रंगातील काही साड्या कोणत्याही कार्यक्रम सोहळ्यावेळी नेसू शकता.
भाजपच्या एका माजी नगरसेवकाने ठाणे-घोडबंदर मार्गावरील चेने गावात त्याच्या हॉटेलमध्ये प्रवेश रोखणाऱ्या मिडीयनच्या बांधकामाचा निषेध नोंदवण्यासाठी अर्धनग्न अवस्थेत गेले.
द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे नेते ए राजा आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. अशातच पुन्हा एकदा डीमकेच्या नेत्याने देश विरोधी विधाने दिल्याने खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी दक्षिणेतील राज्यांचा दौरा करत आहेत. मंगळवारी तेलंगणातील संगारेड्डी येथील जाहीर सभेला त्यांनी संबोधित केले.