पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी (17 मे) मुंबईतील शिवाजी पार्क येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या मंचावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेही जनतेला संबोधित करणार आहेत. अशातच मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहतूकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पीए विरोधात आप नेत्या स्वाती मालिवाल यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. स्वाती मालिवाल यांना मारहाण झाल्याचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात आतापर्यंत काय-काय झाले याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
Cannes 2024 : कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील अभिनेत्री ऐश्वर्या रायचा पहिला लुक समोर आला आहे. हाताला दुखापत झाली असली तरीही अभिनेत्रीच्या लुकने सर्वांचे लक्ष डिझाइनर गाउनने वेधले.
तुम्हाला बँकेत मुदत ठेव (FD) करायची असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने 15 मे 2024 पासून ठराविक कालावधीसाठी उपलब्ध असलेल्या FD वरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.
भारतातील टुरिस्टला श्रीलंकेत युनिफाइड पेंमेंट इंटरफेस (UPI) चा वापर करता येणार आहे. या ट्रांजेक्शनच्या माध्यमातून भारतीय चलनाचा वापर केला जाऊ शकतो. श्रीलंकेसह अन्य ठिकाणीही युपीआय प्रणालीचा वापर केला जात आहे.
सरकारने साधारणपणे वापरल्या जाणाऱ्या 41 औषधांच्या मधुमेह, हृदय आणि यकृताच्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सहा फॉर्म्युलेशनच्या किमती कमी केल्या आहेत.अँटासिड्स, मल्टीविटामिन्स आणि अँटीबायोटिक्स ही औषधे स्वस्त होणार आहेत.
अयोध्येतील राम मंदिरानंतर आता बिहारच्या सीतामढी येथे माता सीतेचे भव्य मंदिर उभारलं जाईल, असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे.
उबाठा नेते संजय राऊत यांनी शिंदेंवर बॅगेतून पैसे आणत असल्याचा आरोप करत ट्विट केले होते. यावर त्यांनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाला धारेवर धरले. मात्र यावेळी खबरदारी म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगेची झाडाझडती घेतली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली.
बॉलीवूड मधील तीनही खान सोबत काम करण्याचे भाग्य अनेकांना मिळत नाही. यातील अश्या काही अभिनेत्री आहेत ज्यांनी तीनही खान सोबत काम केले आहे. जाणून घ्या कोण आहेत त्या अभिनेत्री.