देशात असे काही चित्रपट बनले आहेत ज्यांच्या निर्मात्यांनी आलिशान सेट तयार करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. यापैकी ३५ कोटी रुपये बाहुबली चित्रपटाच्या सेटवर खर्च करण्यात आले.
संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' चित्रपटाच्या सेटसाठी २० कोटींहून अधिक खर्च करण्यात आला. त्यावेळी चित्रपटात दाखवण्यात आलेली चंद्रमुखीची खोली १२ कोटी रुपयांना बांधण्यात आली होती
करण जोहरच्या ‘कलंक’ या चित्रपटात अनेक नेत्रदीपक सेट पाहायला मिळाले. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, चित्रपटाच्या सेटसाठी अंदाजे १५ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
राजामौली यांच्या 'बाहुबली' चित्रपटात अनेक मोठे सेट दाखवण्यात आले. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या माहिष्मती साम्राज्याचा सेटसह इतर सेट तयार करण्यासाठी ३५ कोटी रुपये खर्च करण्यात आले.
सूरज बडजात्या यांच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात अनेक राजवाडे दाखवण्यात आले होते. या चित्रपटाचा सेट तयार करण्यासाठी सुमारे १३ ते १५ कोटी रुपये खर्च आला होता.
आशुतोष गोवारीकर यांच्या ‘जोधा अकबर’ या चित्रपटाचा सेट कर्जतमध्ये बांधण्यात आला होता. वृत्तांवर विश्वास ठेवला तर चित्रपटाचा सेट तयार करण्यासाठी १२ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
दिग्दर्शक अनुराग कश्यपचा 'बॉम्बे वेल्वेट' हा चित्रपट फ्लॉप ठरला, पण निर्मात्यांनी त्याचे सेट तयार करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले. त्याचा सेट बनवण्यासाठी २६ कोटी रुपये खर्च आला.
अली अब्बास जफरच्या 'भारत' चित्रपटातही अनेक भव्य सेट पाहायला मिळाले होते. वृत्तांवर विश्वास ठेवला तर चित्रपटाच्या सेटसाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
राहुल ढोलकियाच्या 'रईस' या चित्रपटातही नेत्रदीपक सेट दाखवण्यात आले होते. रईसच्या सेटवर १२ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.