न्यायमूर्ती अभय एस ओका आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने पीएमएलए अंतर्गत अटक करण्याच्या ईडीच्या अधिकारांवर आज निकाल दिला.
हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या कंगना राणौतचा "इमर्जंसी" चित्रपट पुन्हा पुढे ढकलण्यात आला आहे. बुधवारी, तिच्या प्रोडक्शन बॅनर मणिकर्णिका फिल्म्सने सोशल मीडियावर एक निवेदन शेअर केले.
पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी अनधिकृत होर्डिंग्ज पुढील 7 दिवसात काढून टाकण्याचे आदर्श दिले आहेत. जे कारवाई करणार नाहीत त्यांना परिणाम भोगावे लागतील असा सज्जड दम सुद्धा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
Cannes 2024 : कान्स फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर उर्वशी रौतेलाने आपला जलवा दाखवला. पण दीपिकाचा कान्समधील लुकला कॉपी केल्याचे दिसून आले. अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला स्वत:कडे पुरेसा वेळ देता येत नाही. अशातच वजन वाढणे, आरोग्यासंबंधित समस्या मागे लागतात. खरंतर, हेल्दी आणि फिट राहणे काळाची गरज आहे. दिवसभरातून केवळ तीन मिनिटे काढून व्यायाम केल्यानेही तुम्ही फिट राहू शकता.
येत्या वर्षभरातच मुंबई उपनगरातील घरांच्या किमती किमान 25 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. TDR मध्ये दुपटीनं वाढ झाल्यानं घरांच्या किमतींत वाढ होणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
पीएम मोदी यांची कल्याणला सभा असल्याने रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनास ठाणे हद्दीत मनाई करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत काल अवजड वाहनांना थांबवण्यात आलं होतं.
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्र राज्यात चार टप्प्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झाले आहे. आता येत्या 20 मे ला पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. अशातच भाजपामधील एका नेत्याने महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे विधान केले आहे.
Pakistan : पाकिस्तानातील एमक्यूएम-पी नेते सैयद मुस्तफा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सैयद मुस्तफा भारताचे कौतुक आणि पाकिस्तानच्या स्थितीवर ताशेरे ओढताना दिसत आहेत.
कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी उमेदवारांकडून नोकरीचा अर्ज मागवण्यात येत आहे. नेमकी कोणती आणि किती पदे रिक्त आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासंदर्भातील अधिकची माहिती खालील बातमीमधून जाणून घ्यावी.