Marathi

पुष्पा २ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ; बाहुबली २चा रेकॉर्ड मोडण्याच्या जवळ

Marathi

'पुष्पा २' चा धुमाकुळ

अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा २’चा धुमाकुळ बॉक्स ऑफिसवर कमी होत नाहीये. चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. चित्रपटाच्या १३ व्या दिवसाच्या कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत.

Image credits: instagram
Marathi

'पुष्पा २' चे १३ व्या दिवसाचे कलेक्शन

पुष्पा २ ने रिलीजच्या १३व्या दिवशी २४.२५ कोटींची कमाई केली आहे. त्याच वेळी, चित्रपटाने हिंदीमध्ये १८.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Image credits: instagram
Marathi

'पुष्पा २'ची एकूण कमाई

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ९५३.३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

Image credits: Social Media
Marathi

इतर भाषांमध्ये 'पुष्पा २'ची एकूण कमाई

'पुष्पा 2'ने १३ दिवसांत तेलगूमध्ये २९०.९ कोटी , हिंदीमध्ये ५९१.१ कोटी, तमिळमध्ये ५०.६५ कोटी रुपये, कन्नडमध्ये ६.८७ कोटी रुपये आणि मल्याळममध्ये १३.७८ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

Image credits: Social Media
Marathi

'बाहुबली २'चा रेकॉर्ड मोडण्याच्या जवळ 'पुष्पा २'

'पुष्पा २' 'बाहुबली २'चा रेकॉर्ड तोडण्यापासून इंचभर दूर आहे. बाहुबली २ ने भारतात १०३१ कोटींची कमाई केली होती.

Image credits: Social Media
Marathi

'पुष्पा २' ने ५ चित्रपटांना मागे टाकले

'पुष्पा २'ने ५ सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांना म्हणजे KGF 2,  RRR, कल्की, जवान व स्त्री 2 यांना कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. चला जाणून घेऊया या चित्रपटांनी किती कमाई केली

Image credits: Social Media
Marathi

1. KGF 2

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या साऊथ स्टार यशचा KGF 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८५९.७ कोटी रुपयांची कमाई केली होती.

Image credits: instagram
Marathi

2. आरआरआर

२०२२ मध्ये राम चरण आणि जूनियर एनटीआरच्या आरआरआर चित्रपटाने ७८२.२ कोटी रुपयांची कमाई केली होती.

Image credits: instagram
Marathi

3. कल्की 2898 एडी

२०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रभास-दीपिका पदुकोणच्या ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६४६.३१ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

Image credits: Social Media
Marathi

4. जवान

२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खान-नयनताराच्या 'जवान' या चित्रपटाने खळबळ उडवून दिली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६४०.५० कोटींची कमाई केली.

Image credits: instagram
Marathi

5. स्त्री 2

२०२४ मध्ये श्रद्धा कपूर-राजकुमार यांच्या स्त्री २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटाने ५९७.९९ कोटींची कमाई केली.

Image credits: instagram

8 चित्रपटांचे सर्वात महागडे सेट; एका सेटच्या किमतीत बनतील २ कांतारा!

2024 मध्ये हार्दिक-नताशा नव्हे या 4 कपल्सचाही झाला घटस्फोट

२०२४ मध्ये सर्वात जास्त कोणत्या अभिनेत्रीने कमावले पैसे, नंबर १वर कोण?

८ टीव्ही स्टारने जग सोडले, मराठी अभिनेते अतुल परचुरे यांनी सोडलं जग