मणिपूरमध्ये कुकी समाजातील समाजकंटकांकडून CRPF वर हल्ला, दोन जवान शहीद

| Published : Apr 27 2024, 07:51 AM IST / Updated: Apr 27 2024, 07:53 AM IST

Blast during election duty CRPF Assistant Commandant martyred

सार

Manipur : मणिपूरमध्ये गेल्या काही काळापासून हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता कुकी समाजातील काही समाजकंटकांनी शुक्रवारी (26 एप्रिल) मध्यरात्री केंद्रीय राखीव पोलीस दलावर हल्ला केला.

Manipur :  मणिपूरमध्ये शुक्रवारी (26 एप्रिल) मध्यरात्री कुकी समाजातील काही समाजकंटकांनी केंद्रीय राखीव पोलीस दलावर हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत दोन जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेची माहिती मणिपूर पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी घटनेबद्दल सविस्तर सांगताना म्हटले की, शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजून 15 मिनिटांच्या आसपास कुकी समाजातील काही समाजकंटकांनी केंद्रीय राखीव पोलीस दलावर हल्ला केला केला. यामध्ये दोन जवान शहीद झाले आहेत. हे दोन्ही जवान मणिपूरमधील बिष्णुपुर जिल्ह्यातील नारानसेना परिसरात तैनात करण्यात आलेल्या सीआरपीएफच्या 128 दलातील होते.

बाह्य मणिपूर जागेवर झाले मतदान
हिंसाचार झालेल्या ठिकाणी लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान नुकतेच झाले आहे. बाह्य मणिपूरची सीट सोडली असता अन्य क्षेत्रात 76.06 टक्के मतदान झाले. येथे माओ विधासभेच्या जागेवरही सर्वाधिक मतदान 89.84 टक्के झाले. दरम्यान, एका निवडणूक अधिकाऱ्याला संशयित समाजकंटकाने धमकावल्यानंतरही नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान केले. याशिवाय उखरूलमध्ये केके लीशी फानित मतदान केंद्रावर सशस्र समाजकंटकांकडून कथित रुपात मतदानावेळी गडबड करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कुकी आणि मैतेई समुदायात आरक्षावरून वाद
बिष्णुपुरबद्दल बोलायचे झाल्यास हे ठिकाण मणिपूरच्या आतमध्येच येते. या परिसरात 19 एप्रिलला मतदान झाले होते. मतदानावेळी हिंसाचारही झाला. दरम्यान, गेल्या वर्षात मणिपूरमध्ये 3 मे रोजी कुकी आणि मैतेई समुदायात आरक्षणावरून हिंसाचारही झाला होता.

मणिपूर हिंसाचारात शेकडोहून अधिक जणांचा मृत्यू
मणिपूरात गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचारात शेकडोहून अधिक नागरिकांना मृत्यू झाला होता. मैतेई समुदायातील नागरिकांना आरक्षण दिल्याचा विरोध कुकी समुदायाकडून करण्यात आला होता. यानंतर मोठ्या प्रमाणात मणिपूरमध्ये हिंसाचार झाला. यानंतर राज्यातीलच हिंसाचार आणि काही वादाची प्रकरणे समोर आली होती. काही व्हिडीओही व्हायरल झाले होते. यावर संपूर्ण देशभरातून प्रतिक्रिया देण्यात आली होती.

आणखी वाचा : 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह म्हणतायत- 'मुस्लिमांना प्राधान्य देणे काँग्रेसचे धोरण', BJP नेते जेपी नड्डांनी दिले असे उत्तर

Indian Air Force : भारतीय हवाई दलाचे UAV विमान राजस्थानमध्ये कोसळलं, स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला