सार

भारतीय हवाई दलाचे UAV विमान राजस्थानमधील जैसलमेर येथे कोसळल्याची माहिती समोर आली असून तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचे बोलले जात आहे. विमान नियमितपणे उड्डाण करत होते. त्यावेळी हा अपघात झाला.यामध्ये अजून जीवित वा वित्तहानी झाल्याचे समोर आलेले नाही.

 

भारतीय हवाई दलाचे UAV विमान राजस्थानमधील जैसलमेर येथे कोसळल्याची माहिती समोर आली असून तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. विमान नियमितपणे उड्डाण करत होते. त्यावेळी हा अपघात झाला आहे. यामध्ये अजून जीवित वा वित्तहानी झाल्याचे समोर आलेले नाही.या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनासह हवाई दलाचे काही अधिकाऱ्यांसह घटना स्थळी पोहोचले आहेत. तसेच ता ठिकाणी अग्निशमन दल देखील पोहोचले आहे.

सध्या अग्निशमन दलाच्या पथकाने विमान कोसळल्यामुळे लागलेली आग आटोक्यात आणली आहे. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. भारतीय हवाई दलाचे UAV विमान राजस्थानमधील जैसलमेर येथे कोसळल्यानंतर स्फोटाचा मोठा आवाज झाला त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातारण पसरले आहे. जैसलमेरच्या पिठाळा भागात हा अपघात झाला आहे.

काय आहे UAV विमान

UAV विमान हवाई दलाच्या सेवेच्या या विमानात पायलट नसतात. ते रिमोट संपूर्ण विमान कंट्रोलने चालवले जाते. या विमानाचा वापर मुख्यतः सीमा भागातील हेरगिरीच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जातो.

आणखी वाचा :

दुसऱ्या टप्प्यातील मतदानाआधी JDU नेत्याची हत्या, लग्नसमारंभावेळी परतताना करण्यात आला गोळीबार

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची मोठी कारवाई, नव्या ग्राहकांसह क्रेडिट कार्ड जारी करण्यावर घातलीय बंदी; जाणून घ्या कारण