सार
Lok Sabha Election 2024 : भाजपाने माजी मुख्यमंत्री मनमोहन सिंह यांचा वर्ष 2009 मधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये माजी पंतप्रधान देशातील संसाधनांवर मुस्लिमांचा पहिला हक्क असल्याचे म्हणत आहेत.
Former PM Manmohan Singh Video : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. अशातच भाजपाने माजी मुख्यमंत्री मनमोहन सिंह यांचा वर्ष 2009 मधील एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये माजी पंतप्रधान म्हणताय की, देशातील संसाधनांवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे. यावरच भाजपाने उत्तर देत म्हटले की, आम्ही करत असलेले दावे आता चुकीचे नाहीत. प्रत्येक बाबतीत काँग्रेसला (Congress) प्राधान्य देणे हा काँग्रेसच्या स्पष्ट धोरणाचा पुरावा असल्याचे दिसून येतेय. याशिवाय भाजपा नेते जेपी नड्डा (JP Nadda) यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले, "काँग्रेस आणि इंडिया आघआडी आपल्या एससी, एसटी आणि ओबीसी वर्गातील नागरिकांचे अधिकार हिरावून घेत मुस्लिमांना देऊ पाहत आहे."
मनमोहन सिंह नक्की काय म्हणाले?
एप्रिल 2009 मधील एक जुना व्हिडीओ भाजपाने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर शेअर केला आहे. यामध्ये माजी पंतप्रधानांचे विधान लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला केलेले आहे. माजी पंतप्रधान म्हणतायत की, “ज्यावेळी कधी देशातील संसाधनाची गोष्ट येते तेव्हा अल्पसंख्यांक, खासकरून गरीब मुस्लिमांचा हक्क सर्वप्रथम असावा. गरीब मुस्लिमानांना देशातील संसाधनांची प्राथमिकता मिळाली पाहिजे. याशिवाय मी आधीही केलेल्या दाव्यांवर कायम आहे.”
भाजपाने साधला निशाणा
व्हिडीओमध्ये माजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाव्यावर भाजपाने निशाणा साधला आहे. भाजपाने म्हटले की, “डॉ. मनमोहन सिंहांचा मुस्लिमांना प्राथमिकता देण्याचा दावा आधीच्या विधानावरील काँग्रेसच्या अफवा आणि दिल्या जाणाऱ्या स्पष्टीकरणाला फेटाळून लावतात. आमचे दावे चुकीचे नाहीत. मुस्लिमांना प्राधान्य देणे काँग्रेसचे स्पष्ट धोरण आहे. हा व्हिडीओ आरक्षण ते देशातील संसाधानांपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीवर मुस्लिमांना प्राधान्य देण्याची काँग्रेसची मानसिकता दाखवून देणारा पुरावा आहे.”
जेपी नड्डांचाही हल्लाबोल
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते जेपी नड्डा यांनी म्हटले की, “काँग्रेस आणि इंडिया आघाडी देशात तुष्टीकरणाच्या राजकारणाला प्रोत्साहन देत आहे. याशिवाय एससी, एसटी आणि ओबीसी वर्गाचा अधिकार हिरावून घेत मुस्लिमांना देऊ पाहत आहे. काँग्रेसचा छुपा अजेंडा आहे. काँग्रेसचा जाहीरनामा पाहिल्यास त्यातही मुस्लिमांचाच मुद्दा दिसतोय. त्यांना देशाच्या विकासाचे काहीही पडलेले नाही. काँग्रेसला केवळ वोटबँकचे राजकरण करता येते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणतात, देशातील संसाधनांवर पहिला हक्क गरीबांचा आहे.”
आणखी वाचा :
Lok Sabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्यातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब उमेदवार कोण ? जाणून घ्या