अहमदाबादहून उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलायनर ७८७ विमानाचा अपघात झाला, ज्यात २६० जणांचा मृत्यू झाला. प्राथमिक अहवालानुसार, विमानाने उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच दोन्ही इंजिन अचानक बंद पडली.
एअर इंडियाच्या विमानाचा अपघात होऊन एक महिना उलटून गेला. पण अजूनही या अपघातातून नागरिक बाहेर पडलेले नाहीत. १२ जूनला अहमदाबादहून उड्डाण केलेल्या बोईंग ड्रीमलायनर ७८७ विमानाला अपघात झाला आणि त्यामध्ये २६० जणांचा मृत्यू झाला. विमानातील केवळ १ प्रवासी वाचला. बाकीच्या २४१ जणांनी अपघातात जीव गमावला. भारतीय विमान दुर्घटना तपास अन्वेषण विभागानं (एएआयबी) या दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल जारी केला आहे. त्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली.
विमानाने उड्डाण केल्यानंतर इंजिन झाले बंद
अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून विमानाने लँडिंग केलं आणि काही क्षणात त्याचा अपघात झाला. विमान आकाशात जात असताना ते उंचीवर गेलं नाही आणि अचानक अपघात झाला. या अपघातातील कारणांचा आढावा घेण्यात आला. विमानानं उड्डाण केल्यावर काही सेकंदातच दोन्ही इंजिन अचानक आपोआप बंद झाली. त्यामुळे विमान कोसळलं, अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे.
एआयबीचा १५ पानांचा अहवाल
एआयबीने जाहीर केलेला अहवाल हा १५ पानांचा आहे. त्यानुसार विमानानं उड्डाणानंतर काही सेकंदात १८० नॉट्सचा वेग गाठला. पण त्यानंतर लगेचच इंजिन-१ आणि इंजिन-२ चे फ्यूल कट ऑफ स्विच (ज्यांच्या माध्यमातून इंजिनाला इंधन पाठवलं जातं) रनपासून कट ऑफ पोझिशनमध्ये गेले. हा प्रकार अवघ्या १ सेकंदाच्या दरम्यान हा प्रकार घडला.
या गोष्टीमुळे विमानाला इंधन मिळणे बंद झालं, ते बंद झाल्यानंतर दोन्ही इंजिनांची एन१ आणि एन२ रोटेशन स्पीड वेगानं कमी होऊ लागला. विमानात असलेल्या व्हाईस रेकॉर्डमध्ये दोन पायलटचे संभाषण रेकॉर्ड झाले आहे. त्यामध्ये एक पायलट दुसऱ्याला तू इंजिन बंद केलं का असं म्हणतो तर यावर दुसरा मी बंद केलं नाही असं उत्तर दिलं. यामध्ये इंजिन दोनही पायलटने बंद केले नव्हते त्यामुळे कदाचित हा प्रकार तांत्रिक बिघाडाचा असू शकतो.
बोईंग कंपनी किंवा त्यांच्यासाठी इंजिन बनवणाऱ्या कंपनीसाठी यामधून कोणताही धोक्याचा इशारा देण्यात आलेला नाही. विमानाचे दोनही इंजिन बंद पडणे ही खूप मोठी धोक्याची घटना आहे. एक इंजिन जरी बंद पडलं तरी दुसऱ्या इंजिनच्या मदतीने पायलट विमानाला आकाशात उडवू शकतात. पण अहमदाबाद येथील घटना दुर्दैवी ठरली आहे.
एआयबीचा १५ पानांचा अहवाल जसाचा तसा…
१५ पानी अहवालातील महत्त्वाचे मुद्दे:
- उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदांतच दोन्ही इंजिन बंद पडले. इंधन कट-ऑफ स्विचेस फक्त एका सेकंदात ‘रन’ वरून ‘कट-ऑफ’ वर हलवले गेले, त्यामुळे इंजिनला इंधन पुरवठा थांबला.
- कॉकपिटमधील ध्वनीमुद्रणात एक वैमानिक विचारतो, "तू का बंद केलं?" दुसरा उत्तर देतो, "मी नाही केलं."
- इंजिन बंद झाल्यावर आपत्कालीन हायड्रॉलिक शक्तीपुरवठ्यासाठी 'राम एअर टर्बाइन' (RAT) नावाचे छोटे प्रोपेलरस्वरूप उपकरण आपोआप सक्रिय झाले. AAIB कडे मिळालेल्या CCTV फुटेजमध्ये RAT दिसून आले.
- वैमानिकांनी इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. N1 किंवा इंजिन १ अंशतः सुरू झाले, पण इंजिन २ कार्यान्वित होऊ शकले नाही. विमान फक्त ३२ सेकंद हवेत होते आणि रनवेपासून ०.९ नॉटिकल मैलांवर एका वसतिगृहावर कोसळले.
- थ्रस्ट लीव्हर्स 'आयडल' स्थितीत सापडले, पण ब्लॅक बॉक्समधील माहितीप्रमाणे टेकऑफ थ्रस्ट अद्याप कार्यरत होती, यावरून एखादा यांत्रिक बिघाड किंवा डिस्कनेक्ट झाल्याचे संकेत मिळतात.
- इंधनाची तपासणी केली असता ते स्वच्छ होते, आणि रिफ्युएलिंग स्त्रोतांकडून कोणतेही दूषित घटक आढळले नाहीत.
- फ्लॅप ५ डिग्रीवर आणि लँडिंग गिअर 'डाउन' स्थितीत होते, जे टेकऑफसाठी सामान्य आहे. पक्ष्यांचा त्रास किंवा हवामानाशी संबंधित कोणतीही अडचण नव्हती. आकाश निरभ्र, चांगली दृश्यता आणि सौम्य वारे होते.
- AAIB च्या अहवालानुसार, उड्डाणापूर्वी वैमानिकांची स्थिती योग्य होती. दोघेही वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त, विश्रांती घेतलेले आणि संबंधित विमानप्रकारावर अनुभवी होते.
- कोणताही तातडीचा घातपाताचा पुरावा सापडलेला नाही. मात्र FAA ने पूर्वीच एका संभाव्य इंधन स्विच दोषाबाबत इशारा दिला होता. परंतु एअर इंडियाने त्या तपासण्या केल्या नव्हत्या.
- विमान वजन व संतुलन मर्यादेत होते. त्यात कोणतेही धोकादायक बदल नव्हते.


