Indore House Fire Kills 7 After EV Charging Point Explodes : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका घरात इलेक्ट्रिक कार चार्ज करत असताना झालेल्या स्फोटामुळे भीषण आग लागली. घरात ठेवलेले अनेक गॅस सिलेंडर फुटल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आणि या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला.

Indore House Fire Kills 7 After EV Charging Point Explodes : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये बुधवारी पहाटे एक मोठी दुर्घटना घडली. घरात इलेक्ट्रिक कार चार्जिंगला लावून कुटुंबीय झोपेत असताना चार्जिंग पॉइंटमध्ये स्फोट झाला. या स्फोटामुळे तीन मजली घरात आग पसरली. आगीच्या उष्णतेमुळे घरात ठेवलेले गॅस सिलेंडरही एकापाठोपाठ एक फुटले, ज्यामुळे संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या भीषण दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

ही घटना इंदूरच्या ब्रह्मेश्वरी ॲनेक्स कॉलनीत पहाटे ३.३० ते ४.३० च्या दरम्यान घडली. घरात असलेले सातही जण या आगीत मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर येत आहे. घरातून एक लहान मूल बेपत्ता असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. चार्जिंग पॉइंटमधील स्फोटामुळे आधी कारने पेट घेतला आणि त्यानंतर आग घरात पसरल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Scroll to load tweet…

आगीच्या या घटनेवेळी घरात जवळपास दहा जण होते. त्यापैकी तिघांना वाचवण्यात यश आले आहे. घराच्या दारांना इलेक्ट्रॉनिक लॉक असल्याने आग लागल्यावर लोकांना बाहेर पडणे कठीण झाले. मृतांचेदेह महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहेत, तर वाचलेल्या तिघांवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.