सार

वर्ष 1998 मध्ये टाटा मोटर्स यांनी आपली पहिली पॅसेंजर कार ''इंडिका' मार्केटमध्ये लाँच केली. हा रतन टाटा यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. कारला मार्केटमध्ये हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. कंपनी सातत्याने तोट्यात जात होती. 

Ratan Tata Birthday : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा आज वाढदिवस साजरा केला जात आहे. खरंतर, रतन टाटा यांनी प्रत्येकाला आयुष्यात हार न मानता प्रयत्न करत त्यामधून यशस्वी कसे व्हायचे याची वेळोवेळी प्रेरणा दिली आहे. एवढेच नव्हे एक उत्तम व्यक्तिमत्व कसे असावे हे रतन टाटा यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. असाच एक रतन टाटा यांचा एक भावनात्मक किस्सा आणि त्यानंतर जे घडले त्याबद्दल जाणून घेऊया...

1973 मध्ये जन्म

28 डिसेंबर 1937 रोजी रतन टाटा यांचा जन्म झाला होता. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे सावत्र नातू नवल टाटा यांचे रतन टाटा मुलगा होते. रतन टाटा यांनी आयबीएमची नोकरी धुडकावून वर्ष 1961 मध्ये टाटा समूहापासून आपल्या करियरला सुरुवात केली. वर्ष 1991 मध्ये रतन टाटा यांना समूहाचे अध्यक्षपद दिले. यानंतर कंपनीने उंच झेप घेतली.

असा घेतला अपमानाचा बदला

वर्ष 1998 मध्ये टाटा मोटर्स यांनी आपली पहिली पॅसेंजर कार इंडिका मार्केटमध्ये लाँच केली. रतन टाटा यांचा इंडिका कार ड्रीम प्रोजेक्ट होता. पण कार मार्केटमध्ये पसंत पडली नाही. कंपनी सातत्याने तोट्यात जात असल्याने सहकाऱ्यांनी ती विक्री करण्याचा सल्ला दिला. यामुळे रतन टाटा यांनी कंपनी विक्री करण्यासाठी अमेरिकेती फोर्ड कंपनीला संपर्क केला.

फोर्ड कंपनीचे मालक बिल फोर्ड यांनी रतन टाटा यांचा अपमान केला. बिल फोर्ड यांनी म्हटले की, "ज्या व्यापाराबद्दल तुम्हाला माहिती नाही त्यामध्ये एवढा पैसा का लावला?" या शब्दांमुळे टाटा दुखावले गेले. अशातच रतन टाटा यांनी बिल फोर्ड यांच्यासोबतचा करार रद्द करत भारतात आले. भारतात परतल्यानंतर रतन टाटांनी टाटा मोटर्स कधीच कोणाला विक्री करणार नाही हे मनाशी पक्के केले. रतन टाटांनी एक रिसर्च टीम तयार केली आणि मार्केटमधील स्थितीचा आढवा घेत काही गोष्टींवर काम करण्यास सुरुवात केली. यानंतर अवघ्या काही काळात इंडिका कारने मार्केटमध्ये आपली पुन्हा नव्याने ओखळ निर्माण केली आणि देश-विदेशातही प्रसिद्ध झाली.

फोर्ड यांची डबघाई तर टाटा यांचे यश

वर्ष 2008 पर्यंत फोर्ड कंपनी दिवाळखोर होण्याच्या मार्गावर पोहोचली होता. टाटा यांनी वेळीच फोर्ड यांच्या आलिशान कारचे ब्रँड जॅग्वार आणि लँड रोव्हर खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला. हा करार 2.3 अरब डॉलरमध्ये झाला होता. यावेळी फोर्डचे मालक बिल फोर्ड यांनी रतन टाटांना उद्देशून म्हटले होते की, "तुम्ही आमची कंपनी खरेदी करुन आमच्यावर फार मोठे उपकार करत आहात."

आज लँड रोव्हर टाटा समूहाचा हिस्सा असून यामध्ये मोठा नफा देखील होत आहे. या घटनेवरुन कळते की, रतन टाटा यांनी आपल्या अपमानाचे उत्तर यशाने दिले. रतन टाटा यांचे विचार आणि धैर्यशीलता त्यांना अखेर यशाच्या शिखरावर घेऊन गेली. रतन टाटा यांचा हा किस्सा अशा प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे जो आयुष्यात संघर्षांचा सामना करतोय.

आणखी वाचा : 

RBI गव्हर्नर ते 10 वर्ष पंतप्रधान, वाचा मनमोहन सिंह यांचा राजकीय प्रवास

मनमोहन सिंग यांची अधुरी इच्छा, जी शेवटपर्यंत पुर्ण होऊ शकली नाही!