वयाच्या ९२ व्या वर्षी देशाचे माजी पंतप्रधान आणि आर्थिक सुधारणांचे जनक डॉ. मनमोहन सिंग यांनी या जगाचा निरोप घेतला. जाताना त्यांच्या मनातील एक इच्छा कधीच पूर्ण होऊ शकली नाही.
डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानातील पंजाब प्रांतात झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले, पण गावाला ते विसरले नाही आणि आठवणी कायम ताज्या राहिल्या.
सिंग लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांना त्यांच्या आजोबांनी वाढवले पण त्यांची एका दंगलीत हत्या झाली. त्यानंतर ते पेशावरला आपल्या वडिलांकडे गेले. फाळणीनंतर भारतात आले.
काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी मुलाखतीत सांगितले की, 'जेव्हा मनमोहन सिंग परदेशात काम करायचे, तेव्हा ते पाकिस्तानी मित्रासोबत रावळपिंडीला गेले, पण ते त्यांच्या गावी जाऊ शकले नाही.
राजीव शुक्ला म्हणाले, 'मनमोहन सिंग पंतप्रधान असताना एकदा त्यांना पाकिस्तानातील त्यांच्या गावात जायचे होते. ज्या शाळेत ते शिकले तिथे जायची इच्छा होती पण जाऊ शकले नाही.
राजीव शुक्ला म्हणाले, 'एकदा मी मनमोहन सिंग यांच्यासोबत पीएम हाउसमध्ये बसलो होतो. ते म्हणाले की मला पाकिस्तानात जावेसे वाटते. मला एकदा माझ्या गावी जायचे आहे.
राजीव शुक्लांनी मनमोहन सिंग यांना त्यांचे वडिलोपार्जित घर पहायचे आहे का असे विचारले असता, 'माझे घर फार पूर्वीच संपले आहे, मी चौथीपर्यंत शिकलेली शाळा मला बघायची आहे' असे उत्तर दिले.
मनमोहन सिंग यांची प्राथमिक शिक्षण मिळालेली शाळा पाकिस्तानातील गाह गावात आहे. ज्याचे नाव आता ‘मनमोहन सिंग सरकारी मुलांची शाळा’ आहे.