उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे २०० हून अधिक महाराष्ट्रीयन पर्यटक अडकले आहेत. यमनोत्री परिसरात पावसाने हाहाकार माजवला असून, बचाव पथके पर्यटकांना मदत पोहोचवण्यासाठी काम करत आहेत.
अनेक राज्यांमध्ये हिंदी भाषा सक्तीची केली जात असल्यामुळे विविध प्रादेशिक भाषा बोलणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना कुमार विश्वास यांनी हिंदी भाषेबाबतच्या राजकीय हेतूंवर थेट प्रहार केला.
तेलंगणा भाजपमध्ये नवीन अध्यक्षपदाच्या निवडीमुळे वादंग निर्माण झाले आहे. गोषामहलचे आमदार टी. राजा सिंह यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी घेतला होता, ते आता NIOS च्या अधिकृत संकेतस्थळावर, results.nios.ac.in आपला निकाल पाहू शकतात.
पहलगाममधील एका हॉटेलमध्ये महाराष्ट्रातील ७० वर्षीय पर्यटकावर बलात्कार झाला. आरोपी जुबेर अहमदला अनंतनाग न्यायालयाने जामीन नाकारला असून, न्यायालयाने या गुन्ह्याचा निषेध केला आहे.
तेलंगणातील सांगारेड्डी जिल्ह्यातील पसमायलाराम फेज १ मधील एका रासायनिक कारखान्यात सोमवारी झालेल्या स्फोटात किमान ८ जणांचा मृत्यू झाला असून २६ जण जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
दिवंगत काँग्रेस नेते HKL भगत यांच्या नेतृत्वाखाली 150 हून अधिक काँग्रेसचे खासदार सोव्हिएत रशियाकडून ‘फंडेड’ होते आणि रशियाचे एजंट म्हणून काम करत होते.
केंद्र सरकार पेन्शन कम्युटेशनचा कालावधी १५ वर्षांवरून १२ वर्षांपर्यंत कमी करण्याचा विचार करत आहे. यामुळे लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. कर्मचारी संघटनांनी ही मागणी सरकारकडे केली आहे.
जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरी झाल्याने तीन भाविकांचा मृत्यू झाला असून १० जखमी झाले आहेत. रथाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाल्याने बॅरिगेट्स तुटून भाविक एकमेकांवर पडले. घटनास्थळी रुग्णवाहिका नसल्याने जखमींना उचलून रुग्णालयात नेण्यात आले.
PM Modi interaction with Shubhanshu Shukla: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) वर असलेल्या भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याशी संवाद साधला. या खास संवादात नेमके काय झाले ते जाणून घ्या.
India