तेलंगणातील सांगारेड्डी जिल्ह्यातील पसमायलाराम फेज १ मधील एका रासायनिक कारखान्यात सोमवारी झालेल्या स्फोटात किमान ८ जणांचा मृत्यू झाला असून २६ जण जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
सांगारेड्डी (तेलंगणा) : तेलंगणातील सांगारेड्डी जिल्ह्यातील पसमायलाराम फेज १ मधील एका रासायनिक कारखान्यात सोमवारी स्फोट झाला आहे. या झालेल्या स्फोटात किमान ८ जणांचा मृत्यू झाला असून २६ जण जखमी झाले आहेत. येथे बचावकार्य सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. मल्टी झोन II चे महानिरीक्षक व्ही. सत्यनारायण म्हणाले, "पसमायलाराम येथील सिगाची फार्मा या रसायन उत्पादन कारखान्यात स्फोट झाला. ही घटना सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान घडली आणि १० मिनिटांत पोलिसांना माहिती देण्यात आली. आम्ही २० मिनिटांत घटनास्थळी पोहोचलो.
दहा लोकांचा झाला मृत्यू
NDRF, SDF आणि इतर बचाव पथके, १० अग्निशमन गाड्यांसह घटनास्थळी दाखल झाली. आतापर्यंत सहा मृतदेह सापडले आहेत आणि दोन जणांचा चंदा नगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकूण ८ मृत्यू, २६ जखमी आणि ३ गंभीर स्थितीत आहेत. सरकारी अधिकारी त्यांना सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवत आहेत. शिफ्टमध्ये १५० सदस्य होते, त्यापैकी ९० स्फोट झालेल्या भागात काम करत होते. अग्निशमनचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत आणि बचावकार्य सुरू आहे.
भाजप खासदार काय म्हणाले?
यापूर्वी, भाजप आमदार पायल शंकर यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली होती. पायल शंकर म्हणाले, "राज्य सरकारने जखमींना चांगले उपचार उपलब्ध करून द्यावेत. हे कसे घडले? यासाठी कोण जबाबदार आहे? सुरक्षा नियमांचे पालन केले गेले होते का? गर्दीच्या ठिकाणी असा स्फोट झाला तर अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या घटनेची चौकशी झाली पाहिजे."
मंत्री दामोदर राजा नरसिंह यांनीही घटनास्थळी भेट दिली. पसमायलाराम फेज १ मधील एका रासायनिक कारखान्यात झालेल्या स्फोटात डझनभर कामगार जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच ११ अग्निशमन गाड्या घटनास्थळी धाव घेतल्या आणि अग्निशमन कार्यात गुंतल्या होत्या. "ही घटना पसमायलाराम फेज १ मधील सिगाची फार्मा कंपनीत घडली. ११ अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. जवळपास १५-२० लोक जखमी झाले आहेत. पुढील तपशील लवकरच मिळतील," असे तेलंगणा अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रशासन बचावकार्य करत आहे आणि आतापर्यंत त्यांना घटनास्थळावरून कोणतेही मृतदेह सापडलेले नाहीत. सांगारेड्डीचे पोलीस अधीक्षक परितोष पंकज म्हणाले, "आतापर्यंत आम्हाला कोणतेही मृतदेह सापडलेले नाहीत, बचावकार्य सुरू आहे.
