पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बिहारमधील महाराजगंज येथील एका सभेला संबोधित करताना देशातील जनताच आपली उत्तराधिकारी असल्याचं म्हटलं आहे.
संपूर्ण भारताला आता 4 जूनची प्रतीक्षा आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल कधी जाहीर होतील. महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू आहे. अशा स्थितीत सर्वसामान्यांच्या कामावरही परिणाम होत आहे.
EVM बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स वाढले असून दुसऱ्या पाच कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. वाढलेले शेअर्स कोणते आहेत, ते आपण जाणून घेऊयात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी येथे 25 हजार महिलांशी संवाद साधणार आहेत. येथे प्रत्येक बुथवरून 10 महिलांना बोलवण्यात आले असून घरोघरी जाऊन या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढऊतार पाहायला मिळत आहे. मात्र एकंदरीतच या चढउताराच्या काळात या दोन्ही धातूंची किंमत वधारल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या जागतिक पातळीवर सोने, चांदीच्या मागणीत वाढ झाली आहे.
अमहदाबाद एटीएसने आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. अहमदाबाद विमानतळावरुन चार दहशतवाद्यांना एटीएसने अटक केली आहे.
छत्तीसगडमधील कवार्धा येथे झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत १७ जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे. पिकअप व्हॅन खोल खड्ड्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे.
लैंगिक अत्याचार प्रकरणात कर्नाटकचे जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना जामीन मंजूर झाला आहे. 42 व्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने यापूर्वी 66 वर्षीय राजकारण्याला अंतरिम दिलासा दिला होता.
आम आदमी पक्षाने अवैधरित्या पैसा मिळवला असून याबाबतचा अहवाल ईडीने गृह मंत्रालयाला सादर केला आहे. अमेरिका, कॅनडा आणि अरब देशांमधून हा निधी मिळवला आहे.
अव्वल नेमबाज खेळाडू मनू भाकर हिने ऑलिम्पिक निवड चाचण्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तिने केलेल्या कामगिरीमुळे तिला ऑलिम्पिकमध्ये दोन सामन्यांमध्ये खेळायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
India