लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीने २९२ एनडीए आघाडीने जिंकल्या असून सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. भाजप कार्यकर्त्यांमध्ये आता जल्लोषाचे वातावरण असून इतर देशांच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये अनेक सिनेस्टार निवडणुकीसाठी उभे होते. ते लोकसभेमध्ये निवडून आले असून आपल्या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करताना आता दिसून येणार आहेत. यामध्ये कंगना राणावत, हेमामालिनी हे नाव आघाडीवर आहेत.
एनडीए आघाडी सरकार स्थापनेचा दावा करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधला असे सांगण्यात आले आहे. भाजपला पूर्ण बहुमत मिळवण्यात अपयश आले असले तरी मित्रपक्षांच्या मदतीने ते सत्तास्थापनेचा दावा करतील
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली असून उद्या पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांनी उद्या दिल्लीला जाणार असल्याचे म्हटले आहे.
अयोध्येत भाजपचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असून भाजपच्या पराभवामागची कारणे समजून घ्यायला हवीत. तेच आपण या लेखातून समजून घेणार आहोत.
उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा मतदारसंघात भाजपचा अनेक ठिकाणी पराभव झाला असून यामागची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ते कारण आपण जाणून घेण्याचा या लेखात समजून घेतला आहे.
उदयनराजे भोसले यांनी मतमोजणी चालू असताना आघाडी घेतल्यामुळे कार्यकर्त्यांनी जल मंदिर या त्यांच्या निवासस्थानी जाऊन जल्लोष साजरा केला आहे. त्यावेळी त्यांच्या पत्नीने गळ्यात पडून भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक निकालानंतर पहिली पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी हा निकाल परिवर्तनाला पोषक असल्याचे म्हटले आहे.
सेक्स स्कॅन्डलमधील आरोपी प्रज्वल रेवण्णा याचा हसन लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला आहे. या आरोपीच्या विरोधात नारीशक्तीने एकत्र येऊन मतदान केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
महाराष्ट्रातील नागपूर लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. येथून भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे येथून आघाडीवर असून त्यांना काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी चांगली टक्कर दिल्याचे दिसून आले आहे.
India