पंतप्रधान पदाचा उमेदवार उद्या ठरणार, पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी केले वक्तव्य

| Published : Jun 04 2024, 09:44 PM IST

Uddhav Thackeray

सार

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली असून उद्या पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांनी उद्या दिल्लीला जाणार असल्याचे म्हटले आहे. 

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चांगले यश मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ९ जागा मिळाल्या असून त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ठाकरे यांचे अनेक खासदार पहिल्यांदाच निवडून आले असून त्यामध्ये सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचा नव्याने खासदार म्हणून निवड झाली आहे. 

उद्धव ठाकरे यांनी काय म्हटले पत्रकार परिषदेत? 
उद्धव ठाकरे यांनी सामान्य माणसाची ताकद काय असते हे दिल्लीमध्ये दाखवून दिले आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांना त्यांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडी दावा करणार असल्याचे सांगितले आहे. सकाळी संजय राऊत हे दिल्ली आणि मी दुपारी दिल्लीला जाणार असल्याचे उबाटाचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधान पदाचा उमेदवार उद्या ठरणार - 
पंतप्रधान पदाचा उमेदवार इंडिया आघाडीतील सर्व पक्ष उद्या मिळून ठरवणार असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्या संपूर्ण इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक होणार असून त्यावेळी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला जाईल. त्यानंतर छोट्या मोठ्या घटक पक्षांशी संपर्क साधणार असल्याचे सांगितले आहे. चंद्रबाबू नायडू आणि नितीशकुमार यांना भाजपकडून त्रास दिला असून ते आमच्यासोबत येतील असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.