देशातील या बँकांमध्ये पैसे ठेवणे अत्यंत सुरक्षित, कधीच होणार नाही आर्थिक नुकसान- RBI

| Published : Dec 30 2023, 10:09 AM IST / Updated: Dec 30 2023, 10:14 AM IST

rbi

सार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मते देशातील अशा तीन बँका आहेत ज्या ठिकाणी तुमचे पैसे अगदी सुरक्षित राहू शकतात. या बँका कोणत्या आहेत याबद्दल जाणून घेऊया अधिक....

Business : सध्याच्या काळात कोणीही आपल्या घरात अधिक रोख रक्कम ठेवत नाही. बहुतांशजण बँक खात्यामध्ये पैसे जमा करतात. देशात मोठ्या संख्येने शासकीय आणि खासगी बँका आहेत. याशिवाय देशातील वेगवेगळ्या बँकांकडून नागरिकांना आर्थिक व्यवहारासंदर्भातील उत्तम सुविधा दिल्या जातात.

पण आजही काहींना प्रश्न पडतो की, नक्की कोणत्या बँकेत आपले पैसे सुरक्षित राहतील? याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) सर्वाधिक सुरक्षित बँकांची यादी जारी केली आहे.

आरबीआयने जारी केलेल्या बँकांच्या यादीमध्ये तीन बँका सर्वाधिक सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. आरबीआयने केलेल्या आपल्या सर्व्हेनंतरच सुरक्षित बँकांची यादी जारी केली आहे. याशिवाय या बँकांमध्ये ठेवेले तुमचे पैसे कधीच बुडणार नाही अथवा त्या बँका दिवाळखोरीच्या मार्गावरही जाणार नाही असेही आरबीआयने म्हटले आहे.

या बँकांमध्ये ठेवू शकता पैसे

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
  • एचडीएफसी बँक (HDFC)
  • आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)

आरबीआयकडून प्रत्येक वर्षी जारी होते बँकांची यादी
आरबीआयला ऑगस्ट, 2015 पासून प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यात आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आणि सुरक्षित बँकांची नावे जाहीर करावी लागतात. या बँकांना चार श्रेणीत विभागले जाते. यानुसारच सुरक्षित बँकांची यादी आरबीआयकडून केली जाते. 

याशिवाय देशांतर्गत स्तरासह व्यवस्थेच्या दृष्टीने एप्रिल 2025 पासून एसबीआय बँकेसाठी अतिरिक्त शुल्क 0.8 टक्के असणार आहे. एचडीएफसी बँकेसाठी 04 टक्के अतिरिक्त शुल्क असणार आहे.

आणखी वाचा: 

31st December Deadline Alert : यंदाचे वर्ष संपण्याआधी करा ही महत्त्वाची कामे, अन्यथा होईल नुकसान

फ्रान्समध्ये अडकलेले विमान मुंबईत दाखल, 276 प्रवासी परतले

मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा यांच्या विरोधात FIR दाखल, पत्नीला बेदम मारहाण केल्याचा आरोप